नाशिक जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळिमा; मुख्याध्यापकाचं अत्यंत घाणेरडं कृत्य

On: February 8, 2025 2:14 PM
Crime News
---Advertisement---

Student Rape l नाशिकच्या (Nashik) इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका मुख्याध्यापकाने (Headmaster) 13 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर (Minor Student) अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वर्गशिक्षकानेच (Class Teacher) विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाकडे जाण्यास सांगितले होते. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाला अटक (Arrest) केली आहे. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले? :

इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक (Taked Budruk) येथील शाळेत सहावीत शिकणाऱ्या तेरा वर्षांच्या विद्यार्थिनीला वर्गशिक्षक गोरख जोशी (Gorakh Joshi) याने मुख्याध्यापक तुकाराम साबळेच्या (Tukaram Sable) घरी पाठवले. त्यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि तिला घरी पाठवून दिले.

Student Rape l मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक अटकेत: 

अल्पवयीन मुलीला घरी आल्यानंतर त्रास होऊ लागल्याने हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. कुटुंबीयांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ घोटी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरख जोशी यांना अटक केली. पोलीस पुढील तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पेठरोड परिसरातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार:

दरम्यान, पेठरोडवरील (Pethroad) सुळेवाडी (Sulewadi) परिसरात एका युवकाने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) पोक्सोअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोट्या उर्फ भाऊसाहेब काबू तांदळे (रा. सुळेवाडी, मखमलाबाद) असे आरोपीचे नाव आहे. त्याने शेजारी राहणाऱ्या घरात मुलगी एकटी असताना तिच्या घरात घुसून अत्याचार केला. यावेळी मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने आरडाओरडा केला असता संशयित पळून गेला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके (Atul Dahake) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावित (Gavit) करत आहेत.

News Title : Headmaster and Teacher Arrested for Atrocities on Minor Girl in Nashik

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now