देशातील आघाडीची खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करत ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. २.७५% इतका नवा व्याजदर जाहीर करण्यात आला असून, हा दर ICICI आणि Axis बँक यांच्या तुलनेतही कमी आहे. त्यामुळे बचत खात्यात पैसे ठेवणे आता पूर्वीइतके फायदेशीर राहणार नाही.
इतर बँकांशी तुलनात्मक आढावा :
बँकेने १२ एप्रिल २०२५ पासून हा निर्णय लागू केला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग दुसऱ्यांदा रेपो दरात ०.२५% कपात करून तो ६% वर आणला, यानंतर HDFC बँकेने देखील निधीवरील खर्च कमी करण्यासाठी हा पाऊल उचलले आहे.
SBI आणि PNB या सरकारी बँका गेल्या काही वर्षांपासून 2.70% इतकेच व्याज देत आहेत. बँक ऑफ बडोदा देखील सध्या 2.75% व्याजदरावर आहे. HDFC बँकेने 2023 मध्ये HDFC लिमिटेडचे विलीनीकरण केल्यानंतर तिचा क्रेडिट-डिपॉझिट रेशो (CD Ratio) 100% च्या वर गेला होता, जो आता 98% पर्यंत खाली आला आहे. पण हा आकडा पूर्वीच्या 85-87% पेक्षा अजूनही जास्त आहे.
HDFC Bank l ग्राहकांना काय परिणाम? :
HDFC बँकेचे सुमारे ६ लाख कोटी रुपयांचे CASA डिपॉझिट असून त्यात ७०% हिस्सा बचत खात्यांचा आहे. व्याजदर कपात केल्याने बँकेचा निधी खर्च कमी होईल, मात्र ग्राहकांच्या दृष्टीने बचत खात्यातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा आणखी घटेल.
यामुळे काही ग्राहक आपल्या रकमेचा ओढा फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजाराकडे वळवू शकतात.






