Govt Scheme Scam | बेरोजगार तरुणांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana) मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. बेरोजगार युवकांना मदत देण्याऐवजी, राज्यातील एका मोठ्या शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Govt Scheme Scam)
विधान परिषदेतील आरोपानंतर खळबळ
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. योजनेचा निधी योग्य लाभार्थ्यांना पोहोचला नाही, त्यामुळे आता सरकार काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
योजनेचा मूळ हेतू आणि भ्रष्टाचार
राज्यातील 18 ते 35 वयोगटातील बेरोजगारांना दरमहा 6,000 ते 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याची योजना सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली होती. मात्र, लाभार्थ्यांचा शोध घेताना प्रशासनाने शिक्षण संस्थांशी संपर्क साधला असता, संस्थेने बेरोजगार तरुणांच्या नावाऐवजी कार्यरत कर्मचाऱ्यांची नावे शासनाला पाठवली आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. (Govt Scheme Scam)
सरकारी योजनेत गैरव्यवहार झाल्यानंतर, कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाने शिक्षण संस्थेला नोटीस पाठवली आहे. शासनाच्या अटींचा भंग झाल्यामुळे, लाभार्थ्यांची वेतन पावती, आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे मागवण्यात आली आहेत.
Title : Govt Scheme Scam Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana






