जर तुम्ही Google Chrome ब्राऊजर (Browser) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जुन्या व्हर्जनवर क्रोम वापरणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे तुमची संवेदनशील माहिती (Sensitive Information) देखील धोक्यात येऊ शकते.
तुम्ही Windows, Linux किंवा Mac वर Google Chrome वापरत असाल तरीही हा धोका कायम आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपला ब्राउझर अपडेट (Update) करणे गरजेचे आहे.
भारत सरकारने (Indian Government) Google Chrome युजर्सना गंभीर इशारा दिला असून जुन्या व्हर्जनवर Google Chrome वापरणाऱ्या युजर्सनी लवकरात लवकर आपला ब्राउझर अपडेट करावा, असे आवाहन केले आहे.
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) काही सुरक्षा त्रुटींची (Security Flaws) माहिती दिली आहे. या त्रुटींमुळे युजर्स सायबर हल्ल्यांना (Cyber Attacks) बळी पडू शकतात. यामुळे युजर्सचा डेटा (Data) आणि डिव्हाईस (Device) दोन्ही धोक्यात येऊ शकतात.
Google Chrome l ‘या’ त्रुटींमुळे हॅकर्सना मिळू शकतो प्रवेश :
CERT-In टीमने दिलेल्या माहितीनुसार, Google Chrome मध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींमुळे रिमोट हॅकर्सना (Remote Hackers) तुमच्या सिस्टमचा कोड (Code) मिळवण्याची संधी मिळू शकते. इतकेच नव्हे तर, या त्रुटींमुळे बाधित सिस्टममध्ये सेवा नाकारण्याची म्हणजेच DoS (Denial of Service) ची स्थिती देखील निर्माण होऊ शकते.
प्रभावित सॉफ्टवेअरमध्ये Windows आणि Mac साठी 132.0.6834.110/111 च्या आधीचे आणि Linux साठी 132.0.6834.110 च्या आधीचे Google Chrome व्हर्जन समाविष्ट आहेत. ही असुरक्षितता अतिशय धोकादायक (High Severity Vulnerability) असून युजर्सना ती टाळायची असेल तर त्यांनी आपला ब्राउझर लवकरात लवकर लेटेस्ट व्हर्जनमध्ये (Latest Version) अपडेट करणे आवश्यक आहे.






