DA Hike | महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाची रूपरेषा (TOR) स्पष्ट होणार आहे. यानंतर मग आयोगाकडून प्रत्यक्षात कामकाज सुरू करण्यात येईल आणि साधारणता २०२७ च्या शेवटी आयोग आपला अहवाल सरकारकडे जमा करणार आहे.
ओडिशा कर्मचाऱ्यांसाठी 2% महागाई भत्ता वाढ मंजूर
ओडिशा राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नवरात्र उत्सवात ओडिशा मधील राज्य कर्मचाऱ्यांना २ टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर केली आहे. या निर्णयानंतर तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील. दरम्यान ओडिशा सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा तेथील साडेआठ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
महाराष्ट्रात महागाई भत्ता ५५%
मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के करण्यात आला. त्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला.
महाराष्ट्रात सुद्धा केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. राज्यातील १७ लाख शासकीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता केंद्राय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर ५५% करण्यात आला.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुढील वाढ अपेक्षित
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महागाई भत्ता वाढ लवकरच होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५% आहे. यात आणखी तीन टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेतला जाण्याची शक्यता आहे आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होईल.
आठवा वेतन आयोग
सातव्या वेतन आयोगाअंतर्गत वाढ मिळत असली तरी, आठव्या वेतन आयोगाची तयारी वेगाने सुरू आहे. आयोगाची रूपरेषा (TOR) आणि स्थापना येत्या काही दिवसांत निश्चित होईल. आयोग २०२७ च्या शेवटी आपला अहवाल सरकारला सादर करण्याची अपेक्षा आहे. अंमलबजावणीची तारीख म्हणून १ जानेवारी २०२६ पासून हा आयोग लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी थकबाकी मिळण्याची सोय होईल. विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.
News Title- Good News For Government Employees






