सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

On: January 22, 2025 11:49 AM
Thane Municipal Corporation
---Advertisement---

Government Jobs | सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India) (सीबीआय) ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 (Junior Management Grade Scale 1) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ९ फेब्रुवारी २०२५ पूर्वी अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज (Online Application) करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना (Notification) काळजीपूर्वक वाचून घ्यावी. (Government Jobs )

अर्ज शुल्क (Application Fees)

या पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील (General Category) उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८५० रुपये अधिक जीएसटी (GST) भरावे लागतील. अनुसूचित जाती (SC), जमाती (ST), पीडब्ल्यूडी (PWD) उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये अधिक जीएसटी आहे.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात: २१-०१-२०२५
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९-०२-२०२५
ऑनलाईन परीक्षेची संभाव्य तारीख: मार्च २०२५
मुलाखतीची संभाव्य तारीख: नंतर जाहीर केली जाईल
वयोमर्यादा (Age Limit) (३०.११.२०२४ रोजी)

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शैक्षणिक पात्रता व निवड प्रक्रिया (Educational Qualification)

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे. याशिवाय, मेडिकल (Medical), इंजिनीअरिंग (Engineering), सीए (CA) पदवी असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

या पदासाठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होईल. प्रथम, ऑनलाइन परीक्षा (Online Exam) घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना अंतिम मुलाखतीसाठी (Interview) बोलावले जाईल. (Government Jobs )

पगार (Salary) व भरती तपशील  (Vacancy Details)

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळेल.

अहमदाबाद (Ahmedabad) – १२३ पदे
चेन्नई (Chennai) – ५८ पदे
गुवाहाटी (Guwahati) – ४३ पदे
हैदराबाद (Hyderabad) – ४२ पदे

अर्ज कसा करावा? (How to Apply?)

उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट centralbankofindia.com ला भेट द्यावी.
होम पेजवरील ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिसशिप भरती’ लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर ‘अप्लाई’ (Apply) बटणावर क्लिक करा.
आवश्यक ती माहिती भरा आणि अर्ज पूर्ण करा.
अर्ज शुल्क भरा. (Government Jobs )
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.
पदवीधरांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Title : Golden Opportunity for Government Jobs Recruitment for Junior Management Grade Scale 1 Posts in Central Bank of India

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now