Gold Silver Rate | देशातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढीचा सिलसिला सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. 17 डिसेंबर 2025 रोजी चांदीच्या दरानं थेट 2 लाख रुपयांचा टप्पा ओलांडत गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जागतिक बाजारातील घडामोडी, औद्योगिक मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत असून सध्या तेजीचं वातावरण दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. याचबरोबर सोन्याच्या दरातही लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली असून, 24 कॅरेट सोनं नवे उच्चांक गाठत आहे. 2025 या वर्षात सोने-चांदीत झालेली एकूण वाढ पाहता, गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष फायदेशीर ठरत असल्याचं चित्र आहे. (Today Gold Silver Rate)
चांदीच्या दरात मोठी उसळी :
भारताच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल 8,775 रुपयांची वाढ झाली असून, 1 किलो चांदीचा दर 2,00,750 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह चांदीचा दर 2,06,772 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. ही वाढ केवळ दागिन्यांच्या मागणीमुळे नाही, तर औद्योगिक वापर आणि गुंतवणुकीसाठी वाढलेल्या मागणीमुळे देखील असल्याचं सांगितलं जात आहे.
2025 या वर्षात आतापर्यंत चांदीच्या दरात एकूण 1,14,733 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. वेंचुरा हेट ऑफ कमोडिटी अँड सीआरएमचे एनएस रामास्वामी यांच्या मते, चांदीचा पुरवठा मर्यादित होत चालला असून मागणी सातत्याने वाढत आहे. या कारणांमुळे भविष्यात चांदीचे दर आणखी वाढून 3 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
Gold Silver Rate | 2 आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर :
सोन्याच्या दरातही आज वाढ पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 936 रुपयांची वाढ होऊन एका तोळ्याचा दर 1,32,713 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर 1,36,694 रुपये इतका आहे. 2025 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या दरात एकूण 56,973 रुपयांची वाढ झाली आहे.
23 कॅरेट सोन्याच्या दरात 933 रुपयांची वाढ होऊन एका तोळ्याचा दर 1,32,182 रुपये झाला आहे, तर जीएसटीसह हा दर 1,36,147 रुपये आहे. 22 कॅरेट सोनं 857 रुपयांनी महागून 1,21,565 रुपयांवर पोहोचलं असून, जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचा दर 1,25,211 रुपये झाला आहे. याशिवाय, 18 कॅरेट सोनं 702 रुपयांनी वाढून 99,535 रुपये, तर 14 कॅरेट सोनं 547 रुपयांनी वाढून 77,637 रुपये प्रति तोळा इतकं झालं आहे. (Today Gold Silver Rate)
सध्या सराफा बाजारात असलेली तेजी पाहता, सोने आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये पुढील काळातही चढती दिशा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील हालचालींचा बारकाईने अभ्यास करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.






