Gold-Silver Rate Today | गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदीने दरवाढीची जोरदार खेळी केली आहे. सलग तीन दिवस वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली असून, गुंतवणूकदारांसाठी मात्र ही संधी ठरत आहे. (Gold-Silver Rate Today)
गुंतवणूकदारांसाठी आनंद, ग्राहकांसाठी चिंतेचा विषय
या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवार आणि मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली होती. या दोन दिवसांत एकूण 540 रुपयांची घसरण झाली होती. मात्र त्यानंतरचे तीन दिवस सोन्यासाठी महत्त्वाचे ठरले. बुधवारी 110 रुपये, गुरुवारी 440 रुपये आणि शुक्रवारी तब्बल 1140 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे एकूण 1690 रुपयांनी दर वाढला.
सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 83,550 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेटसाठी 91,130 रुपये इतका आहे. गुडरिटर्न्सनुसार ही दरवाढ गुढी पाडव्याच्या आधी मोठा आर्थिक झटका देणारी आहे.
दुसरीकडे, चांदीने शुक्रवारच्या दिवशी 3,000 रुपयांची विक्रमी झेप घेतली. याआधी बुधवारी 1,000 रुपयांची वाढ झाली होती, आणि गुरुवारी किंमती स्थिर होत्या. त्यामुळे एक किलो चांदीचा सध्याचा दर 1,05,000 रुपये इतका झाला आहे.
विविध कॅरेटनुसार दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून जाहीर करण्यात आलेल्या दरांनुसार, 24 कॅरेटचे सोने 89,164 रुपये, 23 कॅरेट 88,807 रुपये, 22 कॅरेट 81,674 रुपये, 18 कॅरेट 66,873 रुपये आणि 14 कॅरेट 52,161 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे. तर चांदीचा एक किलोचा दर 1,00,892 रुपये इतका आहे. (Gold-Silver Rate Today)
या दरांमध्ये वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत कर आणि शुल्क यांचा समावेश झाल्यामुळे फरक जाणवतो. त्यामुळे प्रत्यक्ष बाजारात खरेदी करताना किंमती शहरानुसार वेगळ्या दिसू शकतात.
फोनवर मिळवा घरबसल्या दराची माहिती
ग्राहकांना आता घरबसल्या सोन्या-चांदीचे दर जाणून घेता येतात. IBJA कडून दररोज हे दर जाहीर केले जातात. ग्राहकांनी फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास, सर्व कॅरेटचे दर त्वरित मिळतात. ही सेवा विशेषतः स्थानिक दर समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते.
Title : Gold-Silver Rate Today 29 March 2025






