सोनं स्वस्त होणार?; सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

On: January 21, 2025 12:05 PM
Gold Prices
---Advertisement---

Gold Prices May Decrease l गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव (Gold Prices) सातत्याने वाढत आहेत. यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. मात्र, आता सोने आणि चांदीचे भाव पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचा निर्णय ठरू शकतो गेमचेंजर :

मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात (Budget) सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी (Import Duty) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 23 जुलै 2024 रोजी निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्के केली होती. याचा परिणाम म्हणून सोन्याचे भाव बरेच कमी झाले होते. त्यामुळे यावर्षी देखील सोन्याचे भाव कमी होणार की नाही असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

मागील वर्षी बजेटच्या आधी सोन्याचे भाव 82 हजारांच्या घरात होते. त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी 6 टक्के करण्यात आली आणि त्यानंतर 7 ते 10 दिवसांमध्ये सोन्याचे भाव 6000 रुपयांनी घसरून 76000 रुपये प्रति तोळा (Per Tola) झाले होते. त्यानंतर सोन्याच्या किमती काही दिवस कमी झाल्या होत्या, पण नंतर पुन्हा वाढल्या.

Gold Prices May Decrease l भारतीयांकडे जगातील 11 टक्के सोने? :

काही रिपोर्ट्सनुसार (Reports), जगातील 11 टक्के सोने भारतात (India) आहे. भारतीय महिलांकडे (Indian Women) तब्बल 24,000 टन सोने असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतात सोन्याची मागणी (Demand) खूप जास्त आहे. परिणामी, इथे सोने जास्त स्वस्त (Cheap) होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सर्वांच्या नजरा :

यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सोन्याच्या इम्पोर्ट ड्युटीबाबत काहीसा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. परंतु, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

दरम्यान, आता सोन्यासारखेच चांदीलाही (Silver) हॉलमार्किंग (Hallmarking) करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. चांदी देखील शुद्ध (Pure) आहे की नाही हे समजण्यासाठी हॉलमार्किंग करण्याची मागणी केली जात आहे. या मागण्यांचा सरकार कितपत गांभीर्याने विचार करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

News title : Gold Prices May Decrease, Eyes on Budget Session

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now