रेकॉर्डब्रेक! सोन्याने मोडले सगळे अंदाज, एका दिवसात झाली ‘तब्ब्ल’ इतकी वाढ

On: April 10, 2025 3:54 PM
Gold Rate
---Advertisement---

Gold Rate l गेल्या काही दिवसांत घसरत असलेले सोन्याचे दर गुरुवारी पुन्हा एकदा उच्चांकावर पोहोचले आहेत. अमेरिकन विश्लेषकांनी आगामी काळात सोन्याचे दर कमी होतील असा अंदाज वर्तवला असतानाच, आज मात्र 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ₹2,940 ची उसळी पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारात एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे.

आज नाशिकच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर ₹93,410 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला, तर काल (बुधवारी) याच दराची किंमत ₹90,470 होती. त्यामुळे अवघ्या 24 तासांत सोने तब्बल तीन हजार रुपयांनी महागले आहे. दरम्यान, 22 कॅरेट सोन्याचा दरही आता ₹85,630 प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.

सोन्याच्या दरातील घसरणीच्या अंदाजाला धक्का :

अमेरिकेतील मॉर्निंगस्टारसारख्या संस्थांनी सोन्याचे दर 38% नी घसरण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार, भारतात सोन्याचा दर ₹55,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आजच्या अचानक उसळीमुळे त्या सर्व अंदाजांना धक्का बसला आहे. जागतिक अस्थिरता, मध्यपूर्वेतील तणाव आणि डॉलरच्या चलनात झालेली चळवळ याचा परिणाम बाजारावर झाल्याचं बोललं जात आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आज चांदीचा दर ₹2,000 ने वाढून ₹95,000 प्रति किलो झाला आहे. काही दिवसांपासून चांदीचे दर घसरत होते, मात्र आजच्या घडामोडीमुळे चांदीच्या दरातही पुन्हा तेजी आल्याचे दिसून येते.

Gold Rate l ग्राहकांसाठी धक्का, गुंतवणूकदारांसाठी आनंद :

सोन्याची स्वस्ताईची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना यामुळे मोठा आर्थिक धक्का बसला आहे. विवाहसोहळे, सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांच्या खिशाला आता महागाईचा चटका बसणार आहे. मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही दरवाढ चांगला परतावा देणारी ठरू शकते.

सध्याची बाजारस्थिती पाहता, आगामी काही दिवसांत सोन्याचे दर आणखी वाढतील की स्थिर राहतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जागतिक बाजारातील घडामोडी, चलनवाढ आणि व्याजदर यांचा पुढील कालखंडातील निर्णय सोन्याच्या किमती ठरवतील, असं तज्ज्ञांचे मत आहे.

News Title: Gold Price Hits Record High in Nashik: ₹2,940 Surge in a Day Shocks Market

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now