Gold Rate l जर तुम्ही दागिने किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण, सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाल्याचं चित्र दिसत आहे. आज 8 एप्रिल रोजी 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर घटले असून, चांदीच्या किंमती मात्र स्थिर आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर मंगळवारीही ही घसरण कायम राहिल्याने ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी निर्माण झाली आहे.
आजचे 22 कॅरेट सोन्याचे दर :
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने: ₹82,400 (₹600 ने घसरण)
22 कॅरेट प्रति 1 ग्रॅम सोने: ₹8,225
22 कॅरेट प्रति 100 ग्रॅम सोने: ₹8,24,000
गेल्या काही दिवसांत 22 कॅरेट सोन्याचा दर सातत्याने घसरत आहे. 7 एप्रिल रोजी हाच दर ₹83,000 होता, त्यामुळे आज खरेदी केल्यास ग्राहकांना थेट ₹600 पर्यंत फायदा होणार आहे.
24 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर :
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने: ₹89,730
24 कॅरेट प्रति 1 ग्रॅम सोने: ₹8,973
18 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने: ₹67,420 (₹490 ने घसरण)
18 कॅरेट प्रति 1 ग्रॅम सोने: ₹6,730
सोन्याच्या सर्व प्रकारांमध्ये आज किंमती खाली आल्यामुळे दागिने खरेदीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी आजचा दिवस फायदेशीर मानला जात आहे.
चांदीचे दर काय आहेत? :
10 ग्रॅम चांदी: ₹940
100 ग्रॅम चांदी: ₹9,400
1 किलो चांदी: ₹94,000
चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे ज्यांना चांदी खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठीही किंमती स्थिर आहेत.






