Today Gold Price l अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वाद आता उघडपणे आर्थिक बाजारपेठांवर परिणाम करत आहे. विशेषतः सोन्याच्या किमतींमध्ये (Today Gold Price) मोठी उसळी पाहायला मिळत आहे. अमेरिकेने चीनसह इतर देशांवर एकतर्फी टॅरिफ दर लावले आहेत, तर चीननेही याला प्रतिउत्तर देत कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली असून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. परिणामी, भारतात सोन्याच्या दराने एकाच दिवसात 6,250 रुपयांची उसळी घेतली आहे. (Today Gold Price)
दिल्ली सराफा बाजारात 99.5 टक्के शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 96,000 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी बुधवारी हा दर 89,750 रुपये इतका होता. ही किंमत आतापर्यंतची सर्वोच्च असून, दररोजच्या घसरणीनंतर ही उसळी बाजारासाठी आश्चर्यजनक ठरली आहे. तसंच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दरही वाढून 96,450 रुपयांवर गेला आहे, जो मागील दिवसाच्या तुलनेत जवळपास 6,250 रुपयांनी अधिक आहे.
चांदीच्या दरातही वाढ (Silver Rate) :
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. गुरुवारी देशांतर्गत सराफा बाजार महावीर जयंतीनिमित्त बंद होता. मात्र त्यानंतर शुक्रवारी चांदीच्या किमतीत तब्बल 2,300 रुपयांची उसळी आली असून प्रति किलो दर 95,500 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी चांदी 93,200 रुपयांवर बंद झाली होती.
एमसीएक्सवरील वायदा व्यवहारात देखील जून डिलिव्हरीसाठी सोन्याच्या दरात 1,703 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा नवा दर आता 93,736 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. हे सर्व बदल जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे झाले असून, गुंतवणूकदार ‘सेफ हेवन’ म्हणून सोन्याकडे वळत आहेत.
Today Gold Price l आंतरराष्ट्रीय बाजारातही विक्रमी दर :
एलकेपी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, “अमेरिका-चीन टॅरिफ युद्ध, भू-राजकीय तणाव आणि डॉलरमध्ये आलेली घसरण यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत.” आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दर प्रति औंस 3,237.39 डॉलर इतका गेला आहे. आशियाई बाजारांमध्येही या किमतींमध्ये चांगली तेजी दिसून आली आहे. (Today Gold Price)
सध्या जागतिक परिस्थिती पाहता सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवतात. गुंतवणूकदारांसाठी ही स्थिती एक नवीन संधी ठरू शकते.






