Gold Price | जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून आज (5 फेब्रुवारी 2026) सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकावर असलेले दर अचानक खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी खरेदी करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
विशेषतः चांदीच्या दरात झालेली तब्बल 20 हजार रुपयांची घसरण ही बाजारासाठी धक्कादायक मानली जात आहे. त्यामुळे दागिने, भांडी आणि गुंतवणुकीसाठी चांदी खरेदी करणाऱ्यांची सराफा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबई-पुण्यातील 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर :
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 5,020 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,54,420 रुपये इतका झाला आहे, जो काल 1,59,440 रुपये होता. (Today Gold Price)
नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली आणि बारामती या शहरांमध्येही 24 कॅरेट सोन्याचा दर समान पातळीवर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात सोन्याच्या खरेदीला आज वेग आला आहे.
Gold Price | 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर किती? :
22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 4,600 रुपयांची घसरण झाली असून आज हा दर 1,41,550 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 3,760 रुपयांची घट झाली असून आजचा दर 1,15,820 रुपये इतका आहे.
चांदीच्या दरात आज तब्बल 20,000 रुपयांची (Silver Rate Today) घसरण झाली असून आता प्रति किलो चांदीचा दर 3,00,000 रुपये इतका झाला आहे. औद्योगिक मागणीत घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील साठ्यात वाढ यामुळे ही घसरण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.






