जेनेलिया आहे रितेशसाठी वेडी; तिच्या प्रेमाचा तो किस्सा वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

On: February 9, 2023 2:39 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूडचं(Bollywood) आणि महाराष्ट्राचं सर्वात लोकप्रिय कपल म्हणून रितेश-जेनेलियाकडं(Ritesh Deshmukh-Genelia) पाहिलं जातं. रितेश-जेनेलियाची जोडी काहींना इतकी आवडते की त्यांचे सोशल मीडियावर प्रोफाईल फोटोसुद्धा रितेश-जेनेलियाचा असतो.

गतवर्षीच्या अखेरील या लोकप्रिय जोडीचा ‘वेड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं अक्षरश: संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. या चित्रपटातीलही रितेश-जेनेलियाची केमिस्ट्रीला भरपूर पसंती मिळाली.

या लोकप्रिय जोडीच्या प्रेमाचा एक खास किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर काही महिन्यांपूर्वी जेनेलियानं इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ या उपक्रमाच्या माध्यमातून चाहत्यांना तिला प्रश्न विचारण्याची संधी दिली होती.

मग या उपक्रमात एका चाहत्याने जेनेलियाला विचारलं होतं की, रितेशनं तुला दिलेलं बेस्ट गिफ्ट कोणतं?, यावर तिनं एका सुकलेल्या गुलाबाचा फोटो पोस्ट केला होता. मग अनेकांना प्रश्न पडला होता की हे गुलाब कधीचं आहे.

जेनेलियानं यावर खुलासा करत सांगितलं होतं की, २० वर्षांपूर्वी जेव्हा ते एकमेकांना डेट करत होते तेव्हा रितेशनं तिला दिलेलं पहिलं गिफ्ट आहे. यावरून सर्वांनाच कळालं की जेनेलियाचं रितेशवर किती प्रेम आहे.

दरम्यान, रितेश-जेनेलियाच्या लग्नाला कित्येक दिवसांचा कालावधी उलटला तरी या दोघांमधील प्रेम अजूनही तसंच आहे, असं दिसून येतं.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now