पठाणची रेकाॅर्डब्रेक कमाई; आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल

On: February 9, 2023 11:49 AM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) ‘पठाण'(Pathaan) हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला रिलीज झाला. परंतु हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

परंतु सध्या या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पठाण या चित्रपटाची कमाई 400 कोटींच्या पुढं गेली आहे. त्यामुळं पठाण बाॅक्सऑफीसवर जादू दाखवण्यास यशस्वी ठरला आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

पठाण हा चित्रपटाच्या वादात अनेक राजकीय नेत्यांनी उडी टाकत पठाणला विरोध केला होता. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) पठाणवर काय प्रतिक्रिया देतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

मोदींनी संसदेत बोलताना पठाणचं भरभरून कौतुक केलं आहे. काश्मिरमध्ये पठाणच्या निमित्तानं कित्येत दिवसांनी चित्रपटगृहे हाऊसफुल्ल झाली आहेत, असं म्हणत मोदींनी पठाणचं कौतुक केलं.

दरम्यान, मोदींनी यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांना बाॅलिवूड सेलिब्रेटी आणि चित्रपटांबद्दल अनावश्यक टीका करू नका, असं सांगतिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now