“…म्हणून पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पुरुषांनाच मारुन टाकलं”; माजी मुख्यमंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट!

On: April 23, 2025 6:32 PM
pahalgam terror attack
---Advertisement---

Pahalgam Terror Attack | जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड कृत्याचा निषेध करत राजस्थानचे (Rajasthan) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी दहशतवाद्यांना सज्जड दम दिला आहे.

देशात भीती पसरवण्याचा कट-

अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी या हल्ल्याला ‘अंतरात्मा हादरवून टाकणारा’ असे संबोधले आहे. त्यांच्या मते, देशात भयाचे वातावरण निर्माण करण्याच्या व्यापक कटाचा हा भाग आहे. पहलगाम (Pahalgam) हे सीमावर्ती क्षेत्र नसून काश्मीरच्या (Kashmir) अंतर्भागातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. अशा ठिकाणी पोहोचून पर्यटकांना लक्ष्य करणे हा देशभरात दहशत पसरवण्याचा दहशतवाद्यांचा दुष्ट हेतू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या हल्ल्यात पुरुष पर्यटकांची हत्या करून त्यांच्या पत्नी आणि मुलांना जिवंत सोडण्यामागे एक क्रूर मानसिकता असल्याचे गेहलोत (Gehlot) यांनी नमूद केले. हा केवळ मृत्यूचा आघात नसून, त्या महिला आणि मुलांसाठी आयुष्यभर सोबत राहणारा एक भीषण मानसिक धक्का आहे, असे ते म्हणाले.

मानसिक युद्ध आणि सडेतोड उत्तराचा इशारा-

एक्स (X) या सोशल मीडिया मंचावर आपली प्रतिक्रिया देताना गेहलोत (Gehlot) यांनी लिहिले की, पती आणि वडिलांना कुटुंबाच्या डोळ्यांदेखत निर्दयपणे मारणे, हे एका मानसिक युद्धाप्रमाणे आहे. महिला व मुलांना कधीही न भरून येणारी जखम देण्याचा हा प्रयत्न होता.

काँग्रेसच्या (Congress) या वरिष्ठ नेत्याने दहशतवाद्यांना स्पष्ट शब्दात सुनावले की, निःशस्त्र लोकांना शस्त्रांनी मारणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की भारत अशा भ्याड हल्ल्यांपुढे कधीही झुकलेला नाही आणि भविष्यातही झुकणार नाही. आपल्या सुरक्षा दलांकडून या कृत्यांना निश्चितपणे कठोर प्रत्युत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

News Title – Gehlot Condemns Pahalgam Terror Attack

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now