देशातील टॉप १० श्रीमंत कोण? यादीत अदाणींनी मारली बाजी

On: March 27, 2025 3:48 PM
Net Worth 2025
---Advertisement---

Net Worth 2025 l हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुकतीच जाहीर झाली असून, यंदाही भारतातील धनाढ्य उद्योगपतींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे गौतम अदाणी यांच्या संपत्तीत तब्बल 13 टक्क्यांची वाढ झाली असून, त्यांची एकूण संपत्ती आता 8.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये अदाणी आता दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

अदाणींचा झपाटा, अंबानींचा घसरण :

या यादीत रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी प्रथम क्रमांक कायम राखला आहे, मात्र त्यांच्या संपत्तीत एक लाख कोटी रुपयांची घट झाली असून ती आता 8.6 लाख कोटी इतकी आहे. गौतम अदाणी यांनी अंबानींच्या खांद्याला खांदा लावत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या चेअरपर्सन रोशनी नाडर या जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिलांमध्ये स्थान पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती 3.5 लाख कोटी रुपये इतकी असून भारतात त्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. वडील शिव नाडर यांनी नुकतीच कंपनीतील मोठी भागीदारी त्यांच्या नावावर केली आहे.

Net Worth 2025 l भारतातील टॉप 10 श्रीमंतांची यादी :

मुकेश अंबानी (रिलायन्स) – ₹8.6 लाख कोटी

गौतम अदाणी (अदाणी समूह) – ₹8.4 लाख कोटी

रोशनी नाडर (एचसीएल) – ₹3.5 लाख कोटी

दिलीप सांघवी (सन फार्मा) – ₹2.5 लाख कोटी

अजीम प्रेमजी (विप्रो) – ₹2.2 लाख कोटी

कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला ग्रुप) – ₹2 लाख कोटी

साइरस पूनावाला (सीरम इन्स्टिट्यूट) – ₹2 लाख कोटी

नीरज बजाज (बजाज ऑटो) – ₹1.6 लाख कोटी

रवि जयपुरिया (आरजे कॉर्प) – ₹1.4 लाख कोटी

राधाकिशन दमानी (डि मार्ट) – ₹1.4 लाख कोटी

टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांची संपत्ती 2025 मध्ये तब्बल 82 टक्क्यांनी वाढली असून, ती 420 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 34.9 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. ते यंदा चौथ्यांदा हुरुन ग्लोबल बिलिनेअर्स यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.

News Title: Gautam Adani’s Net Worth Jumps 13% in 2025; Top 10 Richest Indians Revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now