सावधान! देशात कोरोनाचा पुन्हा शिरकाव; महाराष्ट्रात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

On: July 17, 2026 12:56 PM
Corona Update
---Advertisement---

Corona Update | देशात पुन्हा एकदा कोरोनाबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) गेल्या 20 दिवसांत कोविड 19 चे 12 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट करत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

20 दिवसांत 12 रुग्णांची नोंद, चार जणांचा मृत्यू :

आंध्र प्रदेशात 26 जून ते 16 जुलै 2026 या कालावधीत कोविडचे 12 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या रुग्णांपैकी चार जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांना यापूर्वीपासून गंभीर स्वरूपाचे इतर आजारही होते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या बाधित रुग्णांवर विशेष वॉर्डमध्ये उपचार सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

यंदाच्या वर्षातील राज्यातील पहिला कोरोना रुग्ण 26 जून रोजी कडप्पा (Kadapa) जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर 1 जुलै ते 16 जुलैदरम्यान आणखी 11 रुग्णांची भर पडली. बाधितांपैकी दोघे हे आधीच कोरोना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील असल्याचे समोर आले आहे. एकूण आठ रुग्ण कडप्पा जिल्ह्यात, दोन गुंटूर (Guntur), एक विशाखापट्टणम (Visakhapatnam) आणि एक काकीनाडा (Kakinada) येथे आढळले.

Corona Update | आरोग्य विभाग सतर्क, देशातील स्थितीवरही लक्ष :

कोरोना व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी 9 जुलै रोजी पाच नमुने पुणे (Pune) येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यातील डॉक्टर, रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे वीरा पांडियन यांनी सांगितले.

सध्या तीन रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून दोन रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तीन रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, यावर्षी देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळ (Kerala) राज्यात आढळले आहेत. 1 जुलैपासून देशभरात एकूण 339 कोविड रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 115 रुग्ण केरळमध्ये आहेत. याशिवाय कर्नाटकमध्ये 64 ,महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) 43, तमिळनाडूमध्ये 39, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह (Andaman and Nicobar Islands) येथे 18, दिल्लीमध्ये 18 आणि राजस्थानमध्ये 18 रुग्णांची नोंद झाली आहे.

News Title: Four deaths due to coronavirus in the country; 48 cases recorded in Maharashtra.

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now