पुढील 48 तास पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

On: July 17, 2026 11:57 AM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यातील हवामानात पुन्हा बदल होत असून मान्सूनने नव्याने सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी 17 जुलै रोजी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 48 तास हवामानातील बदलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हालचाल :

जुलैच्या सुरुवातीला राज्यभर जोरदार बरसलेल्या पावसानंतर काही दिवस विश्रांती मिळाल्याने अनेक भागांत उष्ण व दमट वातावरण निर्माण झाले होते. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभाग (IMD) ने पुढील 24 तासांसाठी 13 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर करत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि काही भागांत जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे.

कोकण विभागातील पालघर (Palghar), ठाणे (Thane), मुंबई (Mumbai), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या विभागात पुढील चार दिवस व्यापक मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, बहुतांश भागांत ढगाळ वातावरण आणि दमट हवामान कायम राहील. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रताही जाणवू शकते. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (Satara) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather Update | उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील परिस्थिती :

उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), नाशिक (Nashik) तसेच घाटमाथ्याच्या परिसरात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र या भागांत समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याने खरीप हंगामासाठी प्रतीक्षा कायम राहणार आहे. येथील कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. या भागासाठी मुसळधार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे. नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), वाशिम (Washim), यवतमाळ (Yavatmal), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), गोंदिया (Gondia) आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

News Title: Yellow Alert for 13 Maharashtra Districts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now