LPG Cylinder Price | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्याने एलपीजी सिलेंडरच्या दरांबाबत ग्राहकांची चिंता वाढली आहे. ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल 85 डॉलरच्या पुढे गेल्याने येत्या काही दिवसांत एलपीजीच्या दरांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच देशातील प्रमुख शहरांमधील घरगुती (14.2 किलो) आणि व्यावसायिक (19 किलो) एलपीजी सिलेंडरचे आजचे दर समोर आले आहेत.
दिल्ली-मुंबईसह प्रमुख शहरांतील एलपीजीचे आजचे दर
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 942 रुपये आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी 2,930 रुपये मोजावे लागत आहेत.
नोएडामध्ये घरगुती सिलेंडर 939.50 रुपये, तर व्यावसायिक सिलेंडर 2,930 रुपये दराने उपलब्ध आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर 941.50 रुपये असून, व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,885.50 रुपये आहे.
कोलकातामध्ये घरगुती सिलेंडर 968 रुपये, तर व्यावसायिक सिलेंडर 3,081.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये घरगुती सिलेंडर 957.50 रुपये, तर व्यावसायिक सिलेंडर 3,106 रुपये दराने विकला जात आहे.
बंगळुरूमध्ये 14.2 किलोचा घरगुती सिलेंडर 944.50 रुपये, तर 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 3,021 रुपये आहे.
पाटणा आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक दर
बिहारची राजधानी पाटणामध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1,031.50 रुपये असून, व्यावसायिक सिलेंडरसाठी 3,227 रुपये मोजावे लागत आहेत.
लखनौमध्ये घरगुती सिलेंडर 979.50 रुपये, तर व्यावसायिक सिलेंडर 3,052.50 रुपये आहे.
दरम्यान, हैदराबादमध्ये घरगुती सिलेंडर 994 रुपये, तर व्यावसायिक सिलेंडर 3,191 रुपये दराने उपलब्ध असून, प्रमुख शहरांमध्ये हे दर सर्वाधिक आहेत. गुरुग्राममध्ये घरगुती सिलेंडर 950.50 रुपये, तर व्यावसायिक सिलेंडर 2,947.50 रुपये आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम होणार?
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव 85.08 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे तेल कंपन्यांवरील आर्थिक दबाव वाढत असून, त्याचा परिणाम आगामी काळात एलपीजी सिलेंडरच्या दरांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील दर आढाव्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत बदल होतो का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
News Title: LPG Cylinder Price Today Fuel Update






