बँकेची काम उरकून घ्या! ‘या’ आठवड्यात ४ दिवस बँका बंद राहणार

On: February 16, 2026 5:40 PM
June Bank Holiday
---Advertisement---

Bank Holiday | या आठवड्यात बँकांमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर आधी सुट्ट्यांची माहिती तपासणे आवश्यक आहे. सण, जयंती आणि नियमित साप्ताहिक विश्रांतीमुळे काही दिवशी शाखा बंद राहणार आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार, चेक क्लिअरन्स किंवा इतर कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे ठरेल.

आरबीआयने जाहीर केली सुट्ट्यांची यादी :

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India – RBI) यांनी फेब्रुवारी २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यासाठी अधिकृत बँक सुट्टीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. विविध राज्यांतील स्थानिक सण, महत्त्वपूर्ण जयंती तसेच राज्यस्थापना दिनाच्या निमित्ताने संबंधित राज्यांमध्ये बँकांचे कामकाज ठप्प राहणार आहे. महाराष्ट्रासह सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमध्ये काही विशिष्ट दिवशी बँका बंद असतील. (Bank Holiday)

१८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी फक्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील, तर उर्वरित राज्यांत नियमित व्यवहार सुरू असतील. त्यानंतर १९ फेब्रुवारी (गुरुवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी राज्यातील सर्व बँक शाखा बंद राहतील.

Bank Holiday | कोणत्या दिवशी कुठे राहणार बँका बंद? :

२० फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमध्ये स्थानिक कारणांमुळे बँकांचे कामकाज होणार नाही. त्यामुळे त्या राज्यांतील ग्राहकांनी व्यवहारांची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. संबंधित राज्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी मात्र सेवा सुरू राहतील. (Bank Holiday News)

२२ फेब्रुवारी (रविवार) हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्यामुळे देशभरातील सर्व बँका बंद असतील. जरी ऑनलाइन बँकिंग, मोबाईल अ‍ॅप आणि एटीएम सेवा सुरू असल्या तरी शाखांमधील प्रत्यक्ष कामकाज होणार नाही. त्यामुळे या चार दिवसांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन व्यवहारांचे नियोजन केल्यास अडचणी टाळता येऊ शकतात.

News title : Four-Day Bank Holiday Alert

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now