भाजपच्या आमदारांमधील वादाने गाठलं टोक; माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार!

On: January 27, 2025 10:32 AM
Crime News
---Advertisement---

Crime News l उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) रविवारी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. भाजपच्या (BJP) एका माजी आमदाराने विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार (Firing) केला. सोशल मीडियावर (Social Media) सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी (Police) घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

गोळीबाराने परिसर हादरला! :

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन (Kunwar Pranav Singh Champion) हे आपल्या समर्थकांसह तीन वाहनांतून खानपूरचे (Khanpur) विद्यमान आमदार उमेश कुमार (Umesh Kumar) यांच्या कार्यालयाजवळ पोहोचले. त्यांच्या समर्थकांकडे शस्त्रे होती. कार्यालयाजवळ पोहोचताच त्यांनी उमेश कुमार यांच्या कार्यालयावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. यापूर्वी काही दिवसांपासून सोशल मीडियावर उमेश कुमार आणि कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांच्यात शाब्दिक वाद सुरू होता. रविवारी या वादाला हिंसक वळण मिळाले. गोळीबाराचा आवाज ऐकून संतप्त झालेले आमदार उमेश कुमार यांनीही पिस्तुलामधून (Pistol) गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आणि उपस्थितांनी त्यांना वेळीच रोखले. या घटनेचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Crime News l कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांना अटक, तुरुंगात रवानगी :

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांना अटक केली आणि त्यांना हरिद्वार पोलिसांच्या (Haridwar Police) ताब्यात दिले. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत. अटकेनंतर चॅम्पियन यांची रवानगी तुरुंगात (Jail) करण्यात आली आहे. पोलिस व्हॅनमधून नेत असताना, “माझ्यावर अन्याय होत आहे,” असे चॅम्पियन म्हणाले. या वादाची सुरुवात आमदार उमेश कुमार यांनी केली होती, असा दावा चॅम्पियन यांच्या पत्नीने केला आहे.

चॅम्पियन यांच्या पत्नीकडून उमेश कुमारांविरोधात तक्रार दाखल :

दरम्यान, चॅम्पियन यांच्या पत्नी देवयानी (Devyani) यांनीही आमदार उमेश कुमार यांच्याविरोधात रुरकी पोलिस ठाण्यात (Roorkee Police Station) तक्रार दाखल केली आहे. उमेश कुमार आमच्या घरात घुसले आणि त्यांनी माझा पती प्रणव चॅम्पियन आणि संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, मुलांना शस्त्र दाखवून धमकावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभवातून वादाची ठिणगी 

आमदार उमेश कुमार यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितले की, “कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांचे उमेदवार लंधौरा आणि धांडेरा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Elections) पराभूत झाले होते. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट टाकली. यावरून आमच्यात सोशल मीडियावर शाब्दिक वाद झाला होता. आज त्यांनी आणि त्यांच्या 50 समर्थकांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी जवळपास 50 गोळ्या झाडल्या. एखाद्या विद्यमान आमदारावर अशाप्रकारे हल्ला होण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे.” या घटनेमुळे उत्तराखंडमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

News Title: Former-BJP-MLA-Opens-Fire-at-Current-MLAs-Office-in-Uttarakhand-Triggered-by-Social-Media-Feud

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now