जगातील सर्वात शक्तिशाली 10 देश कोणते?, फोर्ब्सच्या यादीत भारताला स्थान नाही!

On: February 4, 2025 9:35 AM
Most Powerful Countries
---Advertisement---

Most Powerful Countries | फोर्ब्सने २०२५ मधील जगातील १० सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारताला पहिल्या १० देशांच्या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. ही यादी अनेक महत्वाच्या बाबींवर आधारित आहे. परंतु, प्रचंड लोकसंख्या, जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली लष्कर आणि पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारतासारख्या देशाला वगळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

भारताचे स्थान कुठे? :

भारत जगातील १२ व्या क्रमांकाचा सर्वाधिक शक्तिशाली देश आहे. ही क्रमवारी आर्थिक स्थिती, मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध आणि लष्करी सामर्थ्य यांसारख्या विविध घटकांवर आधारित आहे. जागतिक जीडीपी क्रमवारीत भारत ५ व्या स्थानावर आहे. भारतापुढे अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान हे देश आहेत.

फोर्ब्सने काय सांगितले? :

फोर्ब्सने सांगितले की, ही यादी यूएस न्यूजने तयार केली असून, रँकिंगसाठी पाच मुख्य पॅरामीटर्सचा वापर करण्यात आला आहे.

जगातील सर्वात शक्तिशाली देश? :

रँकिंग देश जीडीपी लोकसंख्या
१. अमेरिका ३०.३४ ट्रिलियन डॉलर ३४.५ कोटी
२. चीन १९.५३ ट्रिलियन डॉलर १४१.९ कोटी
३. रशिया २.२ ट्रिलियन डॉलर १४.३ कोटी
४. ब्रिटन ३.७३ ट्रिलियन डॉलर ६.९१ कोटी
५. जर्मनी ४.९२ ट्रिलियन डॉलर ८.४५ कोटी
६. द. कोरिया १.२५ ट्रिलियन डॉलर ५.१७ कोटी
७. फ्रान्स ३.२८ ट्रिलियन डॉलर ६.६५ कोटी
८. जपान ४.३९ ट्रिलियन डॉलर १२.३७ कोटी
९. सौदी अरेबिया १.१४ ट्रिलियन डॉलर ३.३९ कोटी
१०. इस्राईल ५५०.९१ अब्ज डॉलर ९३.८ लाख

News Title : forbes-most-powerful-countries-2025-india-not-in-top-10

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now