Yogi Adityanath | प्रयागराज (Prayagraj) येथे गंगा (Ganga) आणि यमुना (Yamuna) नदीच्या संगमावर होत असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) कोट्यवधी लोकांनी पवित्र स्नान केले. मात्र, याच पाण्याबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) दिलेल्या माहितीनुसार, नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात विष्ठेत असणारे जिवाणू (Fecal coliform) आढळले आहेत. (Yogi Adityanath)
भाविकांच्या आरोग्याला धोका
जवळपास 144 वर्षांनी एकदा येणाऱ्या महाकुंभचा (Mahakumbh) पवित्र मुहूर्त साधत सुमारे तीन कोटी भाविकांनी प्रयागराजमध्ये स्नान केले. पाण्यात हानिकारक जिवाणू असल्याने भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
संगीतकार विशाल ददलानीने (Vishal Dadlani) उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना आव्हान दिले आहे. “योगी आदित्यनाथ यांनी कॅमेऱ्यासमोर संगमाचे पाणी पिऊन दाखवावे,” असे ददलानीने म्हटले आहे.
योगी आदित्यनाथ यांचा दावा फोल?
महाकुंभाच्या त्रिवेणी संगमात (Triveni Sangam) हानिकारक जीवाणू असल्याचे वृत्त समोर आले, तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते नाकारले होते. आता विशाल ददलानीने याच बातमीचा स्क्रीनशॉट इंस्टाग्राम स्टोरीवर (Instagram Story) शेअर करत, “सर, द्वेष करणाऱ्यांची काळजी करू नका. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, कृपया कॅमेऱ्यासमोर जाऊन नदीच्या पाण्याचा एक घोट घ्या,” असे लिहिले आहे. (Yogi Adityanath)
विशाल ददलानीने शेअर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभाचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा करतात, त्यात विष्ठा मिसळल्याच्या वृत्तांना ते नाकारतात.” प्रचंड संख्येने भाविक नदीत स्नान करत असल्याने गंगेच्या पाण्यात विष्ठेतील जिवाणूंचे प्रमाण वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ तेथील पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सतत काम करत असल्याचे सांगितले असले, तरी भाविक जिथे स्नान करत आहेत, त्या ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये विष्ठेतील जिवाणू सापडले आहेत. हे नमुने 12 आणि 13 जानेवारीला घेण्यात आले होते.
संगमाच्या वरील भागातून स्नानासाठी ताजे पाणी सोडले जात असले, तरी भाविकांची प्रचंड संख्या आणि काही भाविकांकडून नदीकिनारी कचरा आणि विष्ठा केल्याने प्रदूषण वाढल्याचा अंदाज आहे. महाकुंभदरम्यान शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवाद (National Green Tribunal) या सगळ्याची तपासणी करत आहे.
Title : Fecal Bacteria in Prayagraj Sangam Water Vishal Dadlani Challenges Yogi Adityanath to Drink It






