धाराशिव हादरलं! शेतकरी महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण

On: April 25, 2025 6:54 PM
Windmill
---Advertisement---

Dharashiv | शेतकरी (Farmer) हा देशाचा कणा आहे, आणि शेतकरी महिला (Women Farmer) म्हणजे त्या कण्याची ताकद. मात्र, धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात गंधोरा गावात घडलेली घटना ही फक्त एका महिलेची नाही, तर संपूर्ण शेतकरी वर्गाच्या प्रतिष्ठेवर झालेला घाव आहे. पवनचक्की (Windmill) कंपनीच्या खाजगी सिक्युरिटी गार्ड्सने एका महिला शेतकऱ्याला व तिच्या मुलासमवेत बेदम मारहाण केली.

इतकंच नाहीतर महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला असून, त्यानंतर सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

घटना कशी घडली?

महिला शेतकरी शेतातील नुकसानीचा मोबदला (Compensation) आणि तिच्या मुलाला कामावरून का काढले याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी पवनचक्की कंपनीच्या खाजगी सिक्युरिटी गार्ड्सकडे गेली होती. त्यावेळी, तिला आणि तिच्या मुलाला वाईट वागणुकीचा सामना करावा लागला. मारहाणीच्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले असून, या घटनेने लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण केला आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे या मारहाणीच्या घटनेनंतर महिलेने तक्रार (Complaint) नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही आणि उलट तिला धमकी दिली की, “तुमच्यावरच गुन्हा दाखल केला जाईल.” या पोलिसांची निष्क्रियता (Inactivity) सर्वत्र चर्चा होण्यास कारणीभूत ठरली आहे.

ग्रामस्थांचा संताप

गंधोरा गावातील ग्रामस्थ (Villagers) या घटनेबद्दल संताप्त व्यक्त केला आहे. त्यांनी पवनचक्कीच्या कंपनीच्या सिक्युरिटी गार्ड्सवर विनयभंगाचा (Sexual Harassment) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. अनेक नागरिकांनी या प्रकरणाची कठोर चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या मारहाणीमध्ये जखमी झालेले शेतकरी सुनिता दिगंबर सोनटक्के, पांडुरंग सोनटक्के, सहदेव सोनटक्के या तिघांवर नळदुर्गच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Title : Farmer woman beaten until naked in Dharashiv district

Join WhatsApp Group

Join Now