संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा हादरून टाकणारा जबाब समोर!

On: March 29, 2025 9:46 AM
Santosh Deshmukh Case
---Advertisement---

Santosh Deshmukh Murder | बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता निर्णायक वळण आले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या सविस्तर जबाबामुळे आरोपींवरचा दबाव अधिकच वाढला असून, खंडणी आणि धमकीचा तपशील उघड झाला आहे. (Santosh Deshmukh Murder  )

चहाच्या टपरीवरील प्रत्यक्षदर्शीचा गंभीर खुलासा

6 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि त्याचा एक साथीदार आवादा एनर्जी कंपनीच्या (Awada Energy Company) गेटवर पोहोचले होते. त्या वेळी कंपनीबाहेर एका चहाच्या टपरीवर चहा पित असलेल्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिलेल्या जबाबानुसार, सुदर्शनने गेटवर असलेल्या वॉचमनला शिवीगाळ केली. याच वेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे तेथे आले असता, सुदर्शन घुलेने थेट धमकीच दिली की, “वाल्मिक कराडचा (Walmik Karad) माणूस आहे, कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये अण्णाला द्या.”

याचवेळी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कंपनी बंद करू नये, गावातील लोकांचा रोजगार वाचवा, अशी विनंती केली. मात्र सुदर्शन घुलेने ही विनंती धुडकावून लावत सरपंचांना थेट धमकी दिली – “तुला जिवंत सोडणार नाही, तुला बघून घेऊ.” हा जबाब अत्यंत गंभीर मानला जात असून, न्यायालयात या साक्षीला खूप महत्त्व असणार आहे.

प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी

या गंभीर प्रकरणाबाबत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हे केवळ हत्या नाही, तर संघटित गुन्हेगारीचे उदाहरण आहे. त्यांनी आरोप केला की अपहरण करणारे, खून करणारे आणि खंडणी मागणारे सर्व आरोपी एकच असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी देखील माध्यमांशी बोलताना या प्रकरणात स्पष्ट भूमिका मांडली आहे.

धनंजय देशमुख यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे. त्यांनी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची जोरदार मागणीही केली असून, यामुळे लवकरात लवकर न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Title : Eyewitness Confirms Threat in Santosh Deshmukh Murder  Case

 

Join WhatsApp Group

Join Now