Elon Musk | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स, एक्स (पूर्वीचं ट्विटर) तसेच न्यूरोलिंक यांसारख्या कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांच्या खाजगी आयुष्याविषयी काही धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, मस्क विविध महिलांना सरोगसीद्वारे आपली मुले जन्माला घालण्याची ऑफर देत आहेत.
महिलांना ‘गुप्त करार’-
अमेरिकेतील प्रतिष्ठित वॉल स्ट्रीट जर्नल (Wall Street Journal) ने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार, एलन मस्क X (पूर्वीचं ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरून महिलांना संपर्क साधून ‘अपत्य जन्माला घालायचं का?’ अशी थेट ऑफर देतात. काही महिलांनी असा दावा केला आहे की मस्क पृथ्वीच्या अंताआधी स्वतःचं सैन्य उभं करण्याच्या उद्देशाने ही मुले जन्माला घालू इच्छित आहेत. या प्रकरणात मस्क यांनी काही महिलांशी गुप्त गोपनीयता करार देखील केल्याचं उघड झालं आहे.
या रिपोर्टनुसार, मस्क (Elon Musk) यांच्याशी संबंधित चार महिलांकडून १४ मुले झालेली असून, यामध्ये लेखिका जस्टिन विल्सन, संगीतकार ग्राईम्स, न्यूरोलिंकची अधिकारी शिवॉन झिलिस आणि लेखिका अॅशली सेंट क्लेयर यांचा समावेश आहे. तथापि, WSJ ने हे देखील म्हटलं आहे की इतर महिलांपासूनही मस्क यांना अपत्ये असण्याची शक्यता आहे.
सोशल मीडिया फॉलोअर्स घटले
जपानमधील क्रिप्टो इन्फ्लुएन्सर टिफनी फॉंगला मस्क यांनी अपत्यासाठी ऑफर (Elon Musk) दिल्याचंही या रिपोर्टमध्ये नमूद आहे. फॉंगने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर मस्क यांनी तिला अनफॉलो केलं, ज्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्ये घट झाली आणि कमाईवर परिणाम झाला. अॅशली सेंट क्लेयरने देखील मस्ककडून मूल झाल्याचा दावा करत, त्यांच्याशी गुप्त करार करण्यास नकार दिल्याचे उघड केले. अॅशलीला $15 दशलक्षचं ऑफर आणि दरमहा $100,000 देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं.
तिने स्पष्ट केलं की, ती ‘हरम ड्रामामध्ये’ अडकली असून, आपल्या मुलाला गुपितात ठेवण्याची तयारी तिची नाही. ‘हरम’ ही इस्लामी संकल्पना असून, घरातील स्त्रियांसाठी राखीव भाग दर्शवतो.
एलन मस्कच्या सर्व स्त्रीसंबंधांचा मागोवा-
एलन मस्क यांचा पहिला विवाह कॅनडियन लेखिका जस्टिन विल्सनशी झाला होता. त्यांना ५ अपत्ये झाली. दुसऱ्या पत्नी टालुला रायलीसोबत दोन वेळा विवाह आणि नंतर घटस्फोट झाला. ग्राईम्ससोबत ३ मुले, शिवॉन झिलिससोबत ४ मुले आणि अॅशलीकडून एक अपत्य झाल्याचा दावा आहे. एकूण १४ मुलांचे ते वडील आहेत.
मस्कचं मत –
जन्मदर घटल्यास मानवजातीचा विनाश एलन मस्क अनेक वेळा म्हणाले आहेत की जन्मदर घटल्यास मानवजातीचं अस्तित्व धोक्यात येईल. म्हणूनच ते अधिकाधिक मुले जन्माला घालण्याच्या धोरणावर ठाम आहेत. निजी आयुष्य कायम चर्चेत. ELON मस्क सध्या सहा कंपन्यांचे संचालन करत असूनही त्यांचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. 2024 मध्ये त्यांनी टेक्सासमध्ये ₹295 कोटींचा आलिशान बंगला घेतला असून, तिथे ते आपल्या मुलांसह माजी जोडीदारांसोबत राहत असल्याची माहिती आहे.






