Today Pune News l पुणे (Pune) शहरात जमिनीच्या वापरात झालेले बदल, तसेच वेगाने होणारे शहरीकरण यांसारख्या कारणांमुळे चतुर या कीटकांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, एकेकाळी पुण्यात आढळणाऱ्या चतुरच्या आठ प्रजाती आता नामशेष झाल्या आहेत.
संशोधनाचा निष्कर्ष :
एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-World Peace University), पुणे येथील संशोधकांनी चतुर प्रजातींचा अभ्यास केला. त्यांनी केलेल्या संशोधनात, ऐतिहासिक नोंदी असलेल्या चतुरच्या आठ प्रजाती आता पुण्यात अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अभ्यास ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ट्रॉपिकल इन्सेक्ट सायन्स’मध्ये (स्प्रिंगर नेचर पब्लिशिंग (Springer Nature Publishing)) प्रकाशित झाला आहे.
डॉ. पंकज कोपर्डे (Dr. Pankaj Koparde) (फॅकल्टी, पर्यावरण अध्ययन विभाग, एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे) यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. अर्जुष पायरा (Arjush Payara) (पीएचडी स्कॉलर) आणि अमेय देशपांडे (Amey Deshpande) (माजी विद्यार्थी) यांनी या संशोधनात डॉ. कोपर्डे यांना सहकार्य केले. २०१ ९ ते २०२२ या काळात पुणे जिल्ह्यातील ५२ ठिकाणांहून याबाबत माहिती गोळा करण्यात आली होती.
Today Pune News l पाच नवीन प्रजाती :
या अभ्यासामध्ये पश्चिम घाटातील पाच स्थानिक प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे हे ओडोनेटा (ड्रॅगनफ्लाय आणि डॅम्सेलफ्लाय) यांच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे ठिकाण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ड्रॅगनफ्लाय हे शहरी भागातील डास आणि अन्य कीटकांची संख्या नियंत्रित करतात. वन परिसंस्थेमध्ये वाघ महत्त्वाची भूमिका बजावतो, तसेच ड्रॅगनफ्लाय पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत करतात, असे डॉ. पंकज कोपर्डे यांनी सांगितले. डोंगर, गवताळ प्रदेश, नद्या आणि तलाव यांसारख्या शहरी हरित आणि निळ्या परिसंस्थांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे नैसर्गिक परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत विकास नियोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अर्जुष पायरा यांनी म्हटले.






