खुशखबर! केंद्राकडून सर्वसामान्यांना ‘गिफ्ट’, खाद्यतेल स्वस्त होणार

On: May 31, 2025 3:55 PM
Oil Price Hike
---Advertisement---

Edible Oil Price Cut | देशाच्या आर्थिक विकास दराची आकडेवारी जाहीर होताच केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्राने कच्च्या खाद्यतेलावरील बेसिक कस्टम ड्युटी (सीमा शुल्क) मध्ये १० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे देशभरातील नागरिकांना दरवाढीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Edible Oil Price Cut)

करात कपात; महागाईवर काहीसा लगाम :

३१ मेपासून हा निर्णय लागू करण्यात आला असून कच्चे पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल यावर ही सवलत लागू होणार आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ७०% खाद्यतेलाचे आयात करतो. ही आयात मुख्यत्वे इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील, अर्जेंटीना, रशिया आणि यूक्रेन यासारख्या देशांमधून होते.

पूर्वी या तीन प्रकारच्या खाद्यतेलावर २०% सीमा शुल्क होते, जे आता फक्त १०% करण्यात आले आहे. तसेच आयात शुल्क देखील २७.५% वरून आता १६.५% करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये केंद्र सरकारने हे शुल्क वाढवले होते, मात्र आता पुन्हा एकदा सामान्य ग्राहकांच्या हितासाठी त्यात कपात करण्यात आली आहे. (Edible Oil Price Cut)

Edible Oil Price Cut | यापूर्वी सोयाबीन तेलाच्या किंमतीत किरकोळ वाढ :

मागील एका महिन्याच्या आकडेवारीनुसार, काही तेलांच्या किंमतीत घसरण तर काहीत वाढ झाली होती. उदाहरणार्थ, शेंगदाणा तेल एप्रिल अखेरीस १९०.४४ रुपये प्रति किलो होते, जे मे अखेरीस १८८.४७ रुपये पर्यंत खाली आले. मात्र मोहरी, वनस्पती आणि सोयाबीन तेलाच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली होती.

News Title: Edible Oil to Get Cheaper in India as Government Cuts Import Duties by 10%

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now