टोरेस घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; ‘इतके’ कोटी जप्त

On: January 25, 2025 9:11 AM
Torres Scam
---Advertisement---

Torres Scam l सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोरेस (Tores) कंपनीविरुद्ध सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने (ED) गुरुवारी मुंबई (Mumbai) आणि जयपूर (Jaipur) मधील एकूण १३ ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत कंपनीच्या विविध बँक खात्यांमधील तब्बल २१ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

टोरेस (Torus) कंपनीने सोने, चांदी आणि हिऱ्यांमध्ये गुंतवणूक केल्यास घसघशीत परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना फसविले आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला २ ते ९ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या प्रकरणाचा अधिक तपास ईडीकडून (ED) सुरु आहे.

आमिष बोनसचे :

टोरेस (Torus) कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखल्या होत्या. जे गुंतवणूकदार नवीन लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आणतील त्यांना आकर्षक बोनस देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

याशिवाय, कंपनीने अनेक कार्यशाळांचे आयोजन करून, सोशल मीडियाद्वारे (Social Media) जाहिरातबाजी करून आणि लकी ड्रॉ (Lucky Draw) योजनेद्वारे लोकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. लकी ड्रॉ (Lucky Draw) मध्ये काही लोकांना महागड्या कार आणि मोबाईल फोन भेट म्हणून देण्यात आले होते.

Torres Scam l गुन्हा आणि तपास :

या प्रकरणी सर्वप्रथम शिवाजी पार्क (Shivaji Park) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे (Thane) आणि नवी मुंबईतही (Navi Mumbai) कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले.

टोरेस (Torus) कंपनीने मनी लाँड्रिंग (Money Laundering) केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने (ED) काही दिवसांपूर्वी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासाचा एक भाग म्हणून ही छापेमारी करण्यात आली असून यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असे ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी सांगितले.

News Title : ED Raids on Torus Company, Seizes ₹21 Crore

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now