पावसाळ्यात कपडे वाळत नाहीयेत? तर ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

On: July 7, 2026 3:00 PM
Monsoon Tips
---Advertisement---

Monsoon Tips | पावसाळ्यात (Monsoon) सतत पडणारा पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे धुतलेले कपडे वाळवणे अनेकांसाठी मोठी समस्या ठरते. कपड्यांमध्ये दीर्घकाळ ओलावा राहिल्यास दुर्गंधी, बुरशी आणि त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. मात्र, काही सोप्या उपायांचा अवलंब केल्यास कपडे कमी वेळात आणि प्रभावीपणे वाळवणे शक्य होते.

कपड्यांतील ओलावा कमी करण्यासाठी करा हे उपाय :

सततच्या पावसामुळे अनेकदा दोन-दोन दिवस कपडे पूर्णपणे वाळत नाहीत. त्यामुळे कपडे धुतल्यानंतर सर्वप्रथम त्यातील अतिरिक्त पाणी शक्य तितके काढून टाकणे आवश्यक आहे. वॉशिंग मशीन (Washing Machine) वापरत असाल तर स्पिन मोड (Spin Mode) किंवा स्पिन सायकल (Spin Cycle) नक्की चालवा. यामुळे कपड्यांतील मोठ्या प्रमाणातील पाणी बाहेर पडते आणि वाळण्याचा वेळ कमी होतो.

जर कपडे अजूनही जास्त ओले वाटत असतील तर कोरड्या आणि जाड टॉवेलमध्ये ते गुंडाळून हलक्या हाताने दाबा. टॉवेल अतिरिक्त पाणी शोषून घेतो, त्यामुळे कपड्यांतील ओलावा कमी होतो. तसेच पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध नसल्यास कपडे खेळती हवा असलेल्या खोलीत किंवा पंख्याखाली वाळत घालावेत. सतत हवा मिळाल्यामुळे कपड्यांमधील ओलावा लवकर कमी होण्यास मदत होते.

Monsoon Tips | कपडे वाळत घालताना या गोष्टी लक्षात ठेवा :

अनेकजण जागा वाचवण्यासाठी कपडे एकमेकांच्या अगदी जवळ किंवा एकमेकांवर टांगतात. मात्र, त्यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो आणि कपडे वाळण्यास जास्त वेळ लागतो. प्रत्येक कपड्यामध्ये थोडे अंतर ठेवून वाळत घातल्यास सर्व बाजूंनी हवा लागते आणि कपडे अधिक जलद वाळतात.

याशिवाय शर्ट, टी-शर्ट, कुर्ते आणि ड्रेस यांसारखे कपडे दोरीवर दुमडून टांगण्याऐवजी हँगर्स (Hangers) वर वाळत घालणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे कपड्यांचा जास्तीत जास्त भाग हवेशी संपर्कात राहतो, जागाही कमी लागते आणि कपडे लवकर कोरडे होतात. या सोप्या टिप्सचा अवलंब केल्यास पावसाळ्यातही कपडे ओलसर राहण्याची, दुर्गंधी येण्याची किंवा बुरशी निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी करता येते.

News Title: Easy Ways To Dry Clothes Fast

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now