दुबईत पाकिस्तानी व्यक्तीकडून तलवारीने हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू

On: April 16, 2025 8:07 PM
dubai news
---Advertisement---

Dubai News | दुबईतील (Dubai News) एका बेकरीमध्ये घडलेली भयंकर घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. एका पाकिस्तानी व्यक्तीने (Pakistani coworker) तलवारीचा वापर करत दोन भारतीय कामगारांना (Indian workers) निर्घृणपणे ठार केलं  आहे. या हल्ल्यात, त्या व्यक्तीने धार्मिक घोषणाही दिल्या आहे. मृतांमध्ये तेलंगणातील (Telangana victims) दोन नागरिकांचा समावेश आहे.

मृतांची ओळख अष्टपू प्रेमसागर (Ashtapu Prem Sagar) आणि श्रीनिवास म्हणून झाली आहे. अष्टपू प्रेमसागर निर्मल जिल्ह्यातील सोन गावचा रहिवासी होता, तर श्रीनिवास (Srinivas)  निजामाबाद जिल्ह्यातील होते. हे दोन्ही कामगार दुबईतील एका बेकरीत काम करत होते. घटना ११ एप्रिल रोजी घडली आणि हल्ला करणाऱ्या व्यक्तीने यावेळी धार्मिक घोषणा दिल्या, ज्यामुळे अधिक संताप उफाळला आहे.

मृतदेह आणण्यासाठी सरकारकडून मदत-

प्रेमसागरचा काका सांगतो की, अष्टपू प्रेमसागर गेल्या पाच-सहा वर्षांपासून दुबईत (Dubai News) काम करत होता आणि त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तो भारतात आला होता. प्रेमसागरचा कुटुंबीय, पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबाला अद्याप दिली गेलेली नाही.

दुर्दैवी घटनेची माहिती कुटुंबाने भारत सरकारला दिली आहे, तसेच मृतदेह भारतात आणण्यासाठी त्यांनी सरकारकडून मदतीची विनंती केली आहे. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या प्रकरणात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बोलून मदतीची मागणी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा –

दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला सोडणाऱ्या स्थलांतरितांसाठी एक नवा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत, स्थलांतरितांना विमान तिकिटे आणि आर्थिक मदतीची ऑफर दिली जाणार आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, गुन्हेगारांना देशाबाहेर काढण्यावर त्यांची प्राथमिकता आहे, परंतु भविष्यात अन्य स्थलांतरितांसाठी देखील या कार्यक्रमाचा विस्तार केला जाईल.

दुबईतील हल्ल्याने भारतीय समाजात धक्का दिला आहे आणि त्याबाबत एकसाथ निषेध व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून हल्लेखोराची शोध मोहीम सुरू आहे.

News Title – Dubai News 2 indian killed by pakistani

Join WhatsApp Group

Join Now