‘वडिलांमुळे दिशा…’; दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा अँगल समोर

On: March 28, 2025 1:10 PM
Disha Salian postmortem report
---Advertisement---

Disha Salian | दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणात मालवणी पोलिसांनी (Malvani Police) सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमधील एक महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. या अहवालात दिशाने आत्महत्या का केली, यामागचं कारण स्पष्ट करताना तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधामुळे ती मानसिक आणि आर्थिक तणावात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पैशांची मदत करत दिशावर आर्थिक ओझं वाढलं

पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनुसार, दिशा तिच्या वडिलांच्या एका अफेअरमुळे सतत मानसिक दबावाखाली होती. त्या महिलेच्या गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत करावी लागत असल्याने दिशावर खर्चाचे मोठे ओझं आले होते. ती तिच्या मित्रमैत्रिणींशीही याबद्दल चर्चा करत असे आणि वारंवार आर्थिक अडचणींचा उल्लेख करायची.

या सततच्या आर्थिक ताणामुळे दिशाला अनेकदा वैफल्य आले होते. तिचं वैयक्तिक आयुष्य आणि काम यावरही त्याचा परिणाम झाला होता. इतकंच नव्हे तर, वडिलांच्या या वागणुकीमुळे ती अस्वस्थ झाली होती आणि काहीही न बोलता आतून खचत चालली होती, असं अहवालात स्पष्टपणे लिहिलं आहे.

मित्रांशी शेवटपर्यंत व्यक्त करत राहिली वेदना

क्लोजर रिपोर्टमध्ये असं नमूद आहे की, मृत्यूच्या आधी काही दिवस दिशा आपल्या मित्रमैत्रिणींशी सतत संवाद साधत होती. तिच्या मानसिक अवस्थेविषयी ती स्पष्ट बोलायची आणि वडिलांच्या अफेअरबद्दल नाराजी व्यक्त करायची.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निष्कर्ष काढला आहे की, दिशा सालियानने आत्महत्या केली असून, तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारणे, विशेषतः वडिलांच्या वर्तनामुळे निर्माण झालेला आर्थिक आणि मानसिक ताण कारणीभूत ठरला. त्यामुळे पूर्वी या प्रकरणात लावले जाणारे विविध तर्क व संशय मागे पडत आहेत.

 Title: Disha Ended Life Over Father’s Affair

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now