‘सोन्याची जागा दिली, आता पश्चात्ताप…’; दीनानाथ रुग्णालय प्रकरणावर मूळ मालकाची भावनिक पोस्ट

On: April 8, 2025 12:00 PM
Deenanath Hospital Death Case
---Advertisement---

Dinanath Mangeshkar Hospital | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराच्या खर्चासाठी दहा लाख रुपये भरावेत या अटीमुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, रुग्णालयाची जमीन विनामोबदला दान करणारे मूळ मालक खिलारे पाटील यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट लिहिली असून, ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भावनिक नातं आणि दानाची कहाणी

खिलारे पाटील (Khilare Patil) यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं की, एरंडवणे भागातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची ६ एकर जमीन त्यांचं कुटुंब – खास करून कै. पै. काशिश्वर (अण्णासाहेब) आणि श्री. बाळासाहेब (अप्पासाहेब) खिलारे – यांच्या मालकीची होती. त्यांनी ती जमीन धर्मादाय उद्देशाने विनामोबदला दिली. १९८७ च्या सुमारास ceiling कायद्यामुळे जमीन सरकारकडे जाण्याच्या भीतीने आणि मा. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विनंतीमुळे त्यांनी ही जमीन लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या इच्छेनुसार हॉस्पिटलसाठी दान केली.

या जागेवर त्यांचे भावनिक आणि वैयक्तिक आठवणी जुळलेल्या असून, तिथे शेती, म्हसोबाचं स्थान आणि त्यांची लहानपणीची आठवण जोडली गेली आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, “तेव्हा अनेकांनी सल्ला दिला होता की, ही सोन्याची जागा देऊ नका. हॉस्पिटल कमाईचं केंद्र बनेल.” मात्र, कुटुंबाने गरीबांसाठी काही तरी करावं या भावनेतून ती जमीन दिली आणि त्यावर कधीच कुठलेही हक्क मागितले नाहीत.

आजच्या व्यवस्थेवरून खंत आणि पश्चात्ताप

खिलारे पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्यांनी दान केलेल्या जमिनीवर आज गोरगरिब रुग्णांवर होणाऱ्या पैशांवरील अन्यायामुळे त्यांना खंत वाटते. त्यांनी याचा थेट अनुभवही दिला आहे – त्यांच्या कुटुंबातील कै. भाऊसाहेब खिलारे यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्यानंतर, दान केलेल्या जागेच्या बदल्यात कोणतीही सवलत दिली गेली नाही. उलट, डॉक्टर भेट घेतल्याचेही चार्जेस बिलामध्ये लावले गेले.

त्यांनी लिहिलं, “हे पाहून भाऊसाहेब हसत म्हणाले, ‘या हाताचं दान त्या हाताला समजू द्यायचं नसतं. ही आपली नियत आणि त्यांची नियत.’” त्यांनी यामध्ये असंही म्हटलं आहे की, जर पूर्वी घेतलेला निर्णय बदलता आला असता, तर कदाचित अशा परिस्थितीचा सामना करावा लागला नसता.

Title: Dinanath Mangeshkar Hospital Donated Land, Now Deep Regret

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now