‘माझा भाऊ शेती विकून पैसे देतो बोलला, तरीही…’, तनिषा भिसेच्या नंदेने सांगितला सुन्न करणारा घटनाक्रम

On: April 4, 2025 12:02 PM
Tanisha Bhise Death Case
---Advertisement---

Dinanath Mangeshkar Hospital |  पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) गर्भवती तनिषा सुशांत भिसे (Tanisha Sushant Bhise) यांच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पैशांअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. आता तनिषा यांच्या नणंदेने रुग्णालयात घडलेला मन सुन्न करणारा घटनाक्रम सांगितला आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

रुग्णालयातील थरार

तनिषा यांच्या नणंदेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना प्रसूतीकळा सुरू झाल्याने बुधवारी सकाळी ९ वाजता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) आणण्यात आले. “वहिनीचं बीपी चेक केल्यावर डॉक्टर घैसास (Dr. Ghaisas) यांनी सांगितलं, की बीपी १५०-१०० आहे. तिला नवीन इमारतीत तिसऱ्या मजल्यावर आणा,” असे नणंदेने सांगितले. असेसमेंट रूममध्ये गेल्यानंतर ज्युनिअर डॉक्टरांनी तनिषा यांना काहीही खाऊ-पिऊ नका असे सांगितले कारण परिस्थिती गंभीर (Critical Situation) होती आणि सिझेरियन (Caesarean Section) करावे लागण्याची शक्यता होती.

थोड्या वेळाने डॉ. घैसास पुन्हा आले. त्यावेळी तनिषा, तिचे पती सुशांत आणि नणंद उपस्थित होते. “वहिनी चेअरवर बसणार तोच त्यांनी सांगितलं की, क्रिटिकल सिच्युएशन आहे, ब्लिडिंग होतंय, पोटात दुखतंय, बीपीही हायर साईडला आहे, इमर्जन्सी सिझर करावं लागेल. प्रीमॅच्युअर डिलीव्हरी असेल, बाळांना सातव्या महिन्यामुळे NICU मध्ये ठेवावं लागेल,” असे डॉक्टर म्हणाले. धक्कादायक म्हणजे, डॉक्टरांनी त्याचवेळी खर्चाचा आकडा सांगितला, “NICU चा खर्च प्रत्येक बाळाचा दहा-दहा लाख रुपये आहे. तुम्हाला आता २० लाख रुपये डिपॉझिट द्यावे लागतील.” कुटुंबीयांनी विनंती केल्यानंतर ते १० लाखांवर आले, पण पैसे भरल्याशिवाय उपचार सुरू होणार नाहीत आणि “तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ससूनला (Sassoon Hospital) जाऊ शकता,” असेही त्यांनी सांगितल्याचा दावा नणंदेने केला.

Dinanath Mangeshkar Hospital | कुटुंबीयांचा आक्रोश

“डॉक्टर हे सगळं माझ्या वहिनीसमोर बोलत होते. तिची मानसिक अवस्था ठीक नाही, पोटात दुखतंय, ब्लिडिंग होतंय हे समजत असूनही त्यांनी सांगितलं आणि निघून गेले,” असे सांगताना नणंदेच्या डोळ्यात पाणी आले. “वहिनी रडत रडत लॉबीतून गेली, असेसमेंट रुमला जाऊन बसली. आम्ही तिला सांगितलं, की पैशांची व्यवस्था आम्ही करतो, तुम्ही उपचार सुरु करा, आयव्ही लावा, ब्लिडिंग थांबवा, पण ते म्हणे तुमच्याकडे जी ब्लिडिंग थांबवायची गोळी असेल ती खा, उपचार सुरुच केले नाहीत,” असा हतबल अनुभव त्यांनी कथन केला. तनिषा २० लाख रुपये कुठून आणणार याच तणावात गेल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने तर मुख्यमंत्री सहायता निधीतून (Chief Minister’s Relief Fund) फार तर एक-दोन लाख मिळतील, पण डिपॉझिट भरल्याशिवाय उपचार सुरू होणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तनिषा यांचे पती सुशांत भिसे (Sushant Bhise) यांच्या एका मित्राने सांगितले की, “सुशांत भाऊंनी डॉक्टरना फोन केला, की आम्ही पैसे भरतो, तुम्ही उपचार सुरु करा. आम्ही ३ लाख रुपये बिलिंग काऊण्टरला घेऊन बसलो होतो, ते म्हणाले की १० लाख डिपॉझिट भरा, त्याशिवाय उपचार सुरु होणार नाही.” डॉक्टर केळकर (Dr. Kelkar) यांना फोन केल्यावर त्यांनी सुरुवातीला ‘शेती विकायची गरज नाही, बघू काहीतरी’ असे आश्वासन दिले, पण नंतर फोन उचलणेच बंद केले, असा दावाही करण्यात आला. मुख्यमंत्री सहायता कक्षातून रामेश्वर नाईक (Rameshwar Naik), विविध आमदारांचे स्वीय सहाय्यक, अधिकारी फोन करत होते, तरीही उपचार सुरू केले नाहीत, असेही मित्राने सांगितले. अखेर कुटुंबीयांनी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि कॅबने तेथून निघाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला, पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

News Title- Dinanath Hospital Pune Patient Death Allegation Tanisha Bhise

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now