धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, खंडणीच्या रक्कमेबाबत धक्कादायक माहिती समोर

On: January 29, 2025 9:21 AM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde l राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अनेक शेल कंपन्या (Shell Companies) असून, खंडणीची रक्कम (Extortion Money) या कंपन्यांमध्ये वळती केल्याचा गंभीर आरोप करणारी एक जनहित याचिका (PIL) उच्च न्यायालयात (High Court) दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि सक्तवसुली संचालनालयानेही (ED) समांतर तपास करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. योग्य तपास झाल्यास मंत्र्यावर मकोका (MCOCA) अंतर्गत कलम ३ (५) नुसार कारवाई होऊ शकते, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

RTI कार्यकर्ते केतन तिरोडकर (Ketan Tirodkar) यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेली रक्कम कुठून आली याचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात मनी लाँड्रिंग (Money Laundering) झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

मुंडे आणि वाल्मिक कराड व अन्य काही व्यक्ती संचालक आहेत. एसआयटी वाल्मिक कराडने केलेल्या गुन्ह्यांचा तपास करत आहे. मात्र, हा तपास जेव्हा कॅबिनेट मंत्र्यांच्या (Cabinet Minister) दारापर्यंत येतो तेव्हा तपास थांबवला जातो, असा आरोप तिरोडकर यांनी याचिकेद्वारे केला आहे.  बीडच्या (Beed) पोलीस अधीक्षकांना तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच निवडणूक आयोगाला (Election Commission) ही याचिका आणि मुंडे यांनी आयोगापुढे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पडताळून कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

धनंजय मुंडेंवरील आरोप काय? :

व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलच्या (Venkateshwar Industrial) कार्यालयात वाल्मीक कराडचे (Walmik Karad) बेकायदा धंदे सुरू असतात. तेथूनच त्याने आवादा या पवनऊर्जा (Wind Energy) निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून दोन कोटी रुपयांची लाच (Bribe) मागितली. या कंपनीचे संचालक धनंजय मुंडेही (Dhananjay Munde) आहेत.

जगमित्र साखर कारखान्याचेही संचालक वाल्मीक कराड, धनंजय मुंडे व अन्य काही लोक असून, या कारखान्याच्या कार्यालयाची जागा धनंजय मुंडे यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

News Title: Dhananjay-Munde-Shell-Companies-Extortion-Money-RTI-Activist-Ketan-Tirodkar-Files-PIL

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now