Delhi Literary Convention l 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केली आहे. साहित्यप्रेमींसाठी या संमेलनात विविध महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद आणि सादरीकरणे होणार आहेत.
संमेलनाचा कार्यक्रम :
संमेलनाच्या पहिल्या दिवशी, 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ होईल. दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. सायंकाळी 6:30 वाजता उद्घाटन समारंभाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. रवींद्र शोभणे आणि डॉ. ताराबाई भवाळकर यांच्या भाषणांचा समावेश असेल.
Delhi Literary Convention l 22 फेब्रुवारीच्या कार्यक्रमांची माहिती :
दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या परिसंवादात मराठी समाज आणि भाषा यांचे भविष्य मांडले जाईल. दुपारी 12:30 वाजता ‘मराठीचा अमराठी संसार’ या विषयावर चर्चासत्र होईल.
दुपारी 2:30 ते 4 वाजता ‘भूपाळी ते भैरवी’ या लोकसाहित्यावरील कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. संध्याकाळी 7 वाजता ‘मधुरव’ हा मराठी भाषेचा इतिहास सांगणारा कार्यक्रम मधुरा वेलणकर सादर करतील.
23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता ‘अनुवाद-मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत’ या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी 12 वाजता ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य’ यावर चर्चा होईल. संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम दुपारी 4:30 वाजता होईल.






