दिल्ली कार स्फोटाचा नवा CCTV व्हडिओ आला समोर; पाहा व्हिडीओ

On: November 12, 2025 1:10 PM
Delhi Blast
---Advertisement---

Delhi Car Blast CCTV | दिल्लीतील कार स्फोटानंतर आता त्या घटनेचा पहिला सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, त्यातले दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत. संध्याकाळची वेळ, गाड्यांची प्रचंड वर्दळ आणि मेट्रो स्टेशनजवळ अचानक झालेला भीषण स्फोट. काही सेकंदांत सगळं संपलं. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत.

१० नोव्हेंबरच्या संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक १ जवळ ट्रॅफिक सिग्नलच्या ठिकाणी हा स्फोट झाला. सिग्नल सुटल्यावर गाड्या पुढे सरकत असतानाच एका कारमध्ये अचानक स्फोट झाला. ती कार क्षणात आगीच्या भयंकर गोळ्यात परिवर्तित झाली. काही क्षणांतच आजूबाजूच्या गाड्यांनाही आग लागली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

फक्त 6 सेकंदांत संपले सर्व :

या घटनेचा CCTV VIDEO समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की गाड्या सिग्नलवरून हळूहळू पुढे सरकत आहेत आणि त्याचवेळी हा प्रचंड स्फोट होतो. अवघ्या सहा सेकंदांत सगळं होत्याचं नव्हतं होतं. या भीषण घटनेनंतर दिल्ली पोलिस आणि NIAच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

स्फोट एवढा प्रबळ होता की आसपासच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. स्फोटानंतर आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तासभराहून अधिक काळ झटावे लागले.

Delhi Car Blast CCTV | NIAकडून विशेष तपास :

या घटनेनंतर केंद्र सरकारने तपासाची सूत्रे NIAकडे सुपूर्त केली आहेत. ADG विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादी कटाच्या शक्यतेवर चौकशी सुरू झाली आहे. या विशेष पथकात एक IG, दोन DIG, तीन SP आणि एक DSP स्तराचे अधिकारी सहभागी आहेत. (Delhi Car Blast CCTV Video)

तपासादरम्यान उघड झाले आहे की संशयित उमर मोहम्मद I-20 कारसह कनॉट प्लेस परिसरात CCTV मध्ये दिसला होता. हीच कार नंतर मयूर विहार भागातही आढळली. सूत्रांच्या माहितीनुसार, या जैश मॉड्यूलचा हँडलर परदेशातून सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या माध्यमातून निर्देश देत होता. सुरक्षा यंत्रणांनी त्याची ओळख पटवली असून शोधमोहीम सुरू आहे. (Delhi Explosion Video)

दिल्ली हादरली, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर :

या भीषण स्फोटानंतर दिल्ली पोलिस, NIA आणि इतर सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. मेट्रो स्टेशन परिसरातील वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, तपास पूर्ण होईपर्यंत परिसरात सुरक्षा तुकड्या तैनात आहेत.

News Title: Delhi Car Blast CCTV Video: Massive Explosion Caught on Camera — Everything Over in Just 6 Seconds!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now