दिल्ली स्फोट प्रकरणी खोली क्रमांक ४ आणि १३चे कनेक्शन समोर; असा ठरला प्लॅन

On: November 13, 2025 5:44 PM
Al Falah University
---Advertisement---

Delhi Blast Investigation | दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटप्रकरणी तपास करणाऱ्या एजन्सींना आता काही मोठे पुरावे हाती लागले आहेत. या प्रकरणात अल फलाह विद्यापीठातील (Al Falah University) दोन खोल्यांमधून सापडलेल्या डायऱ्यांमुळे संपूर्ण नेटवर्कचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या डायऱ्या डॉक्टर उमर (Dr Umar) आणि डॉक्टर मुजम्मिल (Dr Muzammil) यांच्या खोल्यांमधून मिळाल्या असून त्यात “ऑपरेशन” हा शब्द वारंवार वापरलेला आहे.

या डायऱ्यांमध्ये एकूण २५ व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत. त्यातील बहुतेक जण जम्मू-काश्मीर आणि फरीदाबाद परिसरातील असल्याचे समोर आले आहे. यामुळे चौकशी आणखी गंभीर स्वरूप धारण करत आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या नोंदीत ८ ते १२ नोव्हेंबरच्या तारखांचा उल्लेख आहे, म्हणजेच दिल्लीतील स्फोटाच्या अगोदरचा कालावधी. (Delhi Blast Investigation)

डायरीत सापडले कोडवर्ड्स आणि ‘ऑपरेशन’चा उल्लेख :

एजन्सींनी जप्त केलेल्या डायऱ्यांमध्ये काही गुप्त संकेत लिहिलेले आहेत. या नोंदींना “लाल किल्ला ब्लास्ट”शी जोडून पाहिले जात आहे. तपासात समोर आले आहे की डॉक्टर मुजम्मिल राहत असलेल्या खोली क्रमांक १३ मधून तब्बल ३६० किलो स्फोटक जप्त करण्यात आले.

याशिवाय उमरच्या खोली क्रमांक ४ मधून सापडलेल्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटक सामग्री तयार करण्याचे आणि साठवण्याचे संदर्भ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणा या दोन्ही डायऱ्यांचा परस्पर संबंध शोधत असून यातून मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे.

Delhi Blast Investigation | दोन वाहनांतून आणखी मोठा कट रचला जात होता :

जांच यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, आतंकी गटाने i20 आणि इको स्पोर्ट या दोन गाड्यांव्यतिरिक्त आणखी दोन वाहने स्फोटासाठी तयार ठेवली होती. उद्देश एकच नव्हता तर चार वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी स्फोट घडवण्याचा कट आखला गेला होता. (Delhi Blast Investigation )

प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे की, या मॉड्यूलमधील सदस्यांना दोन-दोन जणांच्या गटात विभागून वेगवेगळ्या शहरांत पाठवले जाणार होते. प्रत्येक गटाला एक विशिष्ट शहरात IED स्फोट घडवण्याची जबाबदारी दिली गेली होती. यामुळे तपास यंत्रणा आता देशातील इतर शहरांतील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत आहे.

News Title: Delhi Blast Investigation: Al Falah University Room 4 and 13 Diaries Reveal Terror Links Across Multiple Cities

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now