Child Health l लहान मुलांच्या आरोग्यासाठी (Child Health) अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पोषण आहारात (Nutritious Food) मृत उंदीर (Dead Rat) सापडल्याची खळबळजनक घटना वडखळ (Vadkhal) ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये घडली आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत (Integrated Child Development Services) वडखळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीन अंगणवाड्या (Anganwadis) आहेत.
अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी घरपोच वाटप करण्यासाठी येणाऱ्या मल्टी मिक्स सिरियल्स अॅण्ड प्रोटिन्सच्या (Multi Mix Cereals and Proteins) पाकिटात एक मृत उंदीर आढळून आला. ही बाब अंगणवाडी सेविकेच्या लक्षात आली.
अधिकाऱ्यांकडून पाहणी आणि पुढील कारवाई :
या घटनेची माहिती मिळताच पेण (Pen) पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (BDO) सोनल सूर्यवंशी (Sonal Suryavanshi) यांनी तातडीने अंगणवाडीला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील (Pramod Patil) यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
“पोषण आहार पाकिटात मृत उंदराचे अवशेष आढळून आले आहेत. ते पॅकेट पंचनामा करून पुणे (Pune) येथील प्रयोगशाळेत (Laboratory) पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी पुढील कारवाई करतील.”
प्रशासनाकडून चौकशी सुरू :
या घटनेमुळे लहान मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोषण आहारासारख्या महत्त्वाच्या योजनेत अशा प्रकारची निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे नागरिकांकडून बोलले जात आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






