कृषि विभागाचे राज्यस्तरीय निकाल जाहीर, सांगलीत हेक्टरी ८० क्विंटल ज्वारीचं उत्पादन!

On: February 13, 2025 6:09 PM
Crop Competition Record 80 Quintal Jowar Per Hectare in Sangli 
---Advertisement---

Crop Competition | महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, तसेच कृषी उत्पादनात भर घालणाऱ्या शेतकऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन, त्यांच्या प्रयोगातून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी राज्यात पीक स्पर्धा योजना राबविण्यात येते. कृषी विभागाने (Department of Agriculture) २०२३ मधील रब्बी हंगामातील (Rabi Season) राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे. (Crop Competition)

ज्वारी (Jowar) पिकात सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील चंद्रसेन नारायण पाटील (Chandrasen Narayan Patil) यांनी तब्बल ८० क्विंटल ५५ किलो, तर गहू (Wheat) पिकात नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एकलहरे येथील गोरखनाथ पोपटराव राजोळे (Gorakhnath Popatrao Rajole) यांनी ९६ क्विंटल २८ किलो उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विविध पिकांतील विजेते

आदिवासी गटात पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील यमुनाबाई विठ्ठल मोहरे यांनी गहू पिकाचे ५० क्विंटल ९९ किलो हेक्टरी उत्पादन घेऊन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ज्वारी पिकातील आदिवासी गटात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बंधारा येथील लक्ष्मण सजन पाडवी यांनी ३६ क्विंटल १८ किलो उत्पादन घेत पहिला क्रमांक पटकावला आहे. गहू पिकातील आदिवासी गटात नाशिक जिल्ह्यातील धोंडेगाव येथील त्रंबक सुका बेंडकोळी यांनी ५५ क्विंटल २१ किलो उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. (Crop Competition)

हरभरा पिकात सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील नवनाथ दत्तू खोत यांनी हेक्टरी ५२ क्विंटल ५० किलो उत्पादन घेत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याच पिकातील आदिवासी गटात चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द येथील अरुण कवडुजी केदार यांनी ३२ क्विंटल ५२ किलो उत्पादन घेत पहिला क्रमांक पटकाविला. करडई पिकात नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील चैनपूर येथील माधव शंकराव पाटील यांनी हेक्टरी ३८ क्विंटल ५४ किलो उत्पादन घेत प्रथम क्रमांक घेतला आहे.

पीक स्पर्धेचा उद्देश आणि स्वरूप

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान, तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन, हा उद्देश ठेवून राज्यात पीकस्पर्धा राबविण्यात येते. रब्बी हंगाम सन २०२३ पीकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीकस्पर्धा निकाल समितीद्वारे जाहीर करण्यात आले.

पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षिसे देण्यात येतात. ज्या शेतकऱ्यांची स्पर्धेत भाग घेतलेल्या पिकांची उत्पादकता तालुक्याच्या त्या पिकाच्या सरासरी उत्पादकतेच्या (त्या पिकाची मागील ५ वर्षांची सरासरी उत्पादकता) दीडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येते. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास ५० हजार, द्वितीय क्रमांकास ४० हजार, तर तृतीय क्रमांकास ३० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

Title : Crop Competition Record 80 Quintal Jowar Per Hectare in Sangli 

 

Join WhatsApp Group

Join Now