महाराष्ट्र हादरला! भरदिवसा रेल्वे पुलावर तरुणीची निर्घृण हत्या

On: February 3, 2025 6:19 PM
Crime News
---Advertisement---

Crime News | अंबरनाथमध्ये एका भयंकर घटनेने खळबळ उडाली आहे. भरदिवसा, रेल्वे पुलावर एका तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली असून हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, ज्या पुलावर ही घटना घडली तो पूल सध्या प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. (Crime News)

नेमकं काय घडलं?

ही दुर्दैवी घटना दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरून ही तरुणी एका तरुणासोबत जात होती. चालत असताना त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने तरुणाने त्याच्याकडील धारदार शस्त्राने तरुणीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात तरुणी गंभीररित्या जखमी झाली. तिला तात्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृत तरुणी अंबरनाथच्या बारकूपाडा भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, मात्र तिचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. ती तरुणासोबत पुलावरून जात असताना त्यांच्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात नेले, परंतु दुर्दैवाने तिचा जीव वाचू शकला नाही.

पोलिसांकडून तपास सुरू

हल्लेखोर तरुण तरुणीवर वार करत असताना त्या ठिकाणी काही नागरिक उपस्थित होते. काही वयोवृद्ध नागरिकांनी तरुणाला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने त्यांचे काहीही ऐकले नाही आणि तरुणीवर वार करत राहिला. अखेर ती पुलाच्या पायऱ्यांवर कोसळली. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण आणि त्यांच्यातील वादाचे तपशील अद्याप समजू शकलेले नाहीत. पोलीस या सर्व बाबींचा तपास करत आहेत.

ही घटना अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Title : Crime News ambarnath girl murder on railway bridge

 

Join WhatsApp Group

Join Now