“मुलं तुमची, मग करुणा शर्मा आई कशी नाही?”; कोर्टाच्या सवालाने धनंजय मुंडेंची कोंडी

On: March 29, 2025 2:51 PM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील पोटगी प्रकरणात वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं असून, न्यायालयात युक्तीवाद आणि कोर्टाचे सवाल चर्चेचा विषय ठरत आहेत. (Dhananjay Munde)

करुणा मुंडे यांना पोटगी नको? – धनंजय मुंडेंच्या बाजूने युक्तीवाद

वांद्रे सत्र न्यायालयाने करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख पोटगी देण्याचा अंतरिम आदेश दिला होता. या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी माझगाव सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, धनंजय मुंडे यांचे करुणा मुंडेशी (Karuna Munde) अधिकृत लग्न झालेले नाही. ते म्हणाले की, जर लग्नच झाले नाही तर मग पोटगी द्यायची गरज काय?

या युक्तीवादावर कोर्टाने त्यांना थेट विचारले – “मग ही मुलं कोणाची आहेत?” आणि “मूल तुमचं, तर करुणा आई कशी नाही?” असा रोखठोक सवाल न्यायालयाने केला. कोर्टाच्या या प्रश्नामुळे संपूर्ण प्रकरणात नवे वळण आले आहे.

धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी यावर उत्तर दिलं की, राजश्री मुंडे या त्यांच्या अधिकृत पत्नी आहेत. ते स्वतः मुलांना स्वीकारत आहेत, पण करुणा मुंडेशी विवाह केला नाही. त्यावर कोर्टाने परत विचारणा केली – “मुलं तुमची असतील, तर आई कोण?” या प्रश्नावर कोर्टाची भूमिका स्पष्ट झाली की, फक्त विवाह नाही, तर पालकत्वाच्या नात्याची जबाबदारीही महत्वाची आहे.

करुणा मुंडे सक्षम असल्याचं मुंडेंचं म्हणणं

धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी पुढे युक्तीवाद करताना सांगितले की, करुणा मुंडे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत आणि त्या वर्षाला जवळपास 15 लाखांचे उत्पन्न मिळवतात. त्या इन्कम टॅक्सही भरतात. त्यामुळे त्यांना धनंजय मुंडेंकडून पोटगीची गरज नाही.

पण करुणा मुंडे यांनी पोटगीची रक्कम तुटपुंजी असल्याचे सांगत ती वाढवून 9 लाख करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात असल्याचेही धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात नमूद केले. आता या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Title : Court Questions Dhananjay Munde on alimony case

 

Join WhatsApp Group

Join Now