‘मला ओळखत नाही का?’; सायरन वाजवत जाणाऱ्या वाहनचालकाने थेट पोलिसांनाच धमकावलं

On: January 27, 2025 6:12 PM
Chhatrapati  Sambhajinagar News Drunk Driver Threatens Traffic Police After Violating Rules
---Advertisement---

Chhatrapati Sambhajinagar News | छत्रपती संभाजीनगर शहरात भरधाव वेगात व्हीआयपी सायरन वाजवत जाणाऱ्या एका मद्यधुंद कारचालकाने (Drunk Driver), वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करत अवघ्या दोन तासांत निलंबित करण्याची धमकी दिली. ही घटना 24 जानेवारी रोजी सायंकाळी मिल कॉर्नर (Mill Corner) चौकात घडली. (Chhatrapati Sambhajinagar News )

कुणाल बाकलीवाल (Kunal Bakliwal) असे या मद्यधुंद कारचालकाचे नाव असून, त्याच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात (Kranti Chowk Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे, मद्यधुंद वाहनचालकांच्या मुजोरीचा आणि अरेरावीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमके काय घडले?

24 जानेवारी रोजी सायंकाळी, वाहतूक शाखेचे अंमलदार दैनसिंग जोनवाल (Dansing Zonwal) हे सहायक फौजदार बागूल यांच्यासह मिल कॉर्नर चौकात वाहतूक नियमन करत होते. त्याचवेळी, एक महागडी डिफेंडर गाडी (एम एच 20 जीके 1819) सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला असता, बाकलीवाल याने चौकात मधोमध गाडी थांबवून, पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. (Chhatrapati Sambhajinagar News )

“तेरेको ड्यूटी करनी आती क्या? बुड्ढे, मुझे नही पेहचाना क्या?” असे म्हणत त्याने पोलिसांना दोन तासांत निलंबित करण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओही (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे.

पोलिसांची नरमाईची भूमिका, नागरिकांमध्ये आश्चर्य

या घटनेनंतर, पोलिसांनी बाकलीवाल याच्याविरोधात केवळ अदखलपात्र (Non Cognizable) गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार पोलीस आयुक्तालयापासून (Police Commissionerate) अगदी हाकेच्या अंतरावर घडला होता. तरीही या प्रकरणात पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Chhatrapati Sambhajinagar News )

Title : Chhatrapati  Sambhajinagar News Drunk Driver Threatens Traffic Police After Violating Rules

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now