Gopinath Munde Shetkari Apghat Yojana | छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील शेती करताना, सर्पदंश (Snakebite), वीजेचा शॉक (Electric Shock) किंवा अपघातामुळे (Accident) मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना, शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा (Gopinath Munde Shetkari Apghat Yojana ) मोठा आधार मिळत आहे. या योजनेंतर्गत, पात्र शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते.
मागील वर्षभरात, जिल्ह्यातील तब्बल 228 मृत शेतकऱ्यांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कृषी विभागाने (Agriculture Department) दिलेल्या माहितीनुसार, 328 जणांनी अर्ज केले होते, ज्यापैकी 228 जणांना 4 कोटी 37 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, मृत शेतकऱ्याच्या वारसदारांनी, घटनेनंतर एक महिन्याच्या आत, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो.
अर्ज करतेवेळी, विहित नमुन्यातील अर्जासोबत, मृताचा आणि अर्जदाराचा आधारकार्ड (Aadhaar Card), सातबारा (7/12), घटनास्थळ पंचनामा, नमुना क्रमांक 6, मरणोत्तर पंचनामा, शिधापत्रिका (Ration Card) आणि पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. (Gopinath Munde Shetkari Apghat Yojana )
कागदपत्रांची पूर्तता महत्त्वाची; १३८ प्रकरणे प्रलंबित
अनेक अर्ज अपुऱ्या कागदपत्रांमुळे प्रलंबित राहतात. विहित कागदपत्रांपैकी, वाहन चालविण्याचा वैध परवाना, सातबारा, अर्जदाराचे घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे नसल्यास, अर्ज मंजूर होत नाही.
जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख (Prakash Deshmukh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी शासनाची कल्याणकारी योजना आहे. संकटातून सावरण्यासाठी शासनाकडून 2 लाख रुपये देण्यात येतात.” सद्यस्थितीत 138 प्रकरणे निधीअभावी प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली.
दोन लाखांच्या मदतीसाठी ‘हे’ लक्षात ठेवा
अपघात, सर्पदंश किंवा विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला नियमानुसार दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. यासाठी, घटनेनंतर एका महिन्याच्या आत कृषी विभागाकडे अर्ज करणे बंधनकारक आहे. (Gopinath Munde Shetkari Apghat Yojana
)
Title : Chhatrapati Sambhajinagar Gopinath Munde Shetkari Apghat Yojana 2 Lakh Benefit






