गाढवाचं उदाहरण देत छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका, म्हणाले…

On: March 19, 2024 12:04 PM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

Chhagan Bhujbal | अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लढताना दिसत आहेत. त्यांनी आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देत सगेसोयरेची अंमलबजावणी करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. अन्यथा राजकीय सुपडासाफ करू. तुमचा एकही 48 पैकी खासदार निवडून देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. यावर आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जरांगे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, “कोण जरांगे? त्याची पोहोच आहे का? कुठे कोणाला चॅलेंज द्यावं? त्याचा अभ्यास आहे का? आरक्षणावर अभ्यास आहे का? की शिक्षण आहे. मनोज जरांगे यांच्या डोक्यामध्ये हवा गेली आहे”, असं म्हणत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जरांगेंवर निशाणा साधलाय.

गाढवाचे उदाहरण आणि जरांगे यांच्यावर टीका

गाढवाचे उदाहरण देत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. “मी एक गोष्ट सांगितली होती. पाण्याच्या टाकी खाली पोरं उभी होती. तिथ विचारलं वर काय झालं? तर त्यांनी सांगितले. गाढव टाकीच्या वर चढले आहे. त्याला खाली उतरायचे कसे हा तो विचार करतोय. त्यावेळी तिथं गावातील एक पाटील आला आणि त्यांनी सांगितलं की, खाली उतरवायचं नंतर बघू आधी त्याला चढवलं कोणी”, अशी गोष्ट सांगत भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

अशोक चव्हाण आणि जरांगे यांच्या भेटीवर भाष्य

मनोज जरांगे पाटील यांची अशोक चव्हाण यांनी काल परवा भेट घेतली होती. यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. “कदाचित तब्येतीची विचारपूस करायला गेले असतील किंवा त्यांच्या घरातील कोणीतरी उमेदवार उभा राहत असेल. त्याबाबत आपल्याला काही माहिती नाही, तसंही कोणी कोणाला भेटावं आमचं काहीही म्हणणं नाही,” असं भुजबळ म्हणाले आहेत.

त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीवर वक्तव्य केलं आहे. इंडिया आघाडी ही एकत्रित दिसत नाही. “बिहारमध्ये बघितलं नितेश कुमार भाजपसोबत गेले, आम आदमी पार्टी बघितली, सध्या तरी सर्व पक्ष एकत्र आल्याचं दिसत नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

गेली अनेक महिन्यांपासून छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. मधल्या काही दिवसांमध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर कोणतीही टीका केली नव्हती नाशिक येथे बोलत असताना आज छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

News Title – Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil

महत्त्वाच्या बातम्या

“मर्दा सारखं… ”, भाजपची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

‘अशा’ व्यक्तींमध्ये कधीच जीव अडकवू नका, नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत

मोठी बातमी! इम्तियाज जलील यांना ‘एमएआयएम’कडून उमेदवारी जाहीर

“अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या…”; शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“माझी लायकी काय हे पण सांगतो…”, विजय शिवतारेंचा अजित पवारांना इशारा

 

 

Join WhatsApp Group

Join Now