Chanakya Niti | प्राचीन काळातील महान तत्त्वज्ञ आणि रणनीतीकार आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अनेक पैलूंवर भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या ‘चाणक्य निती’ ग्रंथामध्ये स्त्रिया आणि पुरुष यांचे गुणदोष स्पष्ट केले आहेत. त्यांच्या मतानुसार स्त्रियांच्या काही स्वभाववैशिष्ट्यांमुळे नातेसंबंधांमध्ये अडचणी येऊ शकतात. (Chanakya Niti )
चाणक्य यांचा श्लोक-
चाणक्य (Chanakya) यांनी स्त्रियांच्या गुण-दोषांवर भाष्य करत एक श्लोक लिहिला आहे:
“अनृतं साहसं माया मूर्खत्वमितलोभिता।
अशौचत्वं निर्दयत्वं स्त्रीणां दोषा: स्वभावजा:।।”
या श्लोकाचा अर्थ सांगताना चाणक्य म्हणतात की – खोटं बोलणं, धाडस, चलाखी, अज्ञान, अतीलोभ, अशुद्धता आणि निर्दयता हे स्त्रियांचे नैसर्गिक दोष आहेत. हे दोष त्यांच्या स्वभावात जन्मजात असतात.
स्त्रियांबाबतचे चाणक्यांचे विचार
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, स्त्रियांमध्ये साहसाची भावना अधिक असते. त्या एखादं काम करण्यासाठी कोणत्याही मर्यादा ओलांडू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर अंधविश्वास ठेवल्यास धोका संभवतो. तसेच, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लोभ आणि कपटाचा अंश असतो, असंही ते म्हणतात.
तरीही, चाणक्य स्त्रियांविषयी एक संतुलित दृष्टीकोन मांडतात. ते म्हणतात, जरी स्त्रियांमध्ये हे दोष असले, तरीही ममता, करुणा, क्षमा आणि प्रेम यांचे मूळ स्त्रीकडेच आहे. स्त्रीविना पुरुषाचे जीवन अपूर्ण आहे. त्यामुळे केवळ दोष पाहून निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असा सूक्ष्म संकेत त्यांच्या विचारातून मिळतो.
Title : Chanakya Niti on Women Strengths and Flaws






