Chanakya Niti | आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे जीवनसाथीची निवड. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीतून जीवनाच्या प्रत्येक टप्प्याचे मार्गदर्शन केले असून, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तितक्याच उपयुक्त आहेत. (Chanakya Niti )
चाणक्यांनी दिलेले आदर्श जीवनसाथीचे गुणधर्म
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या मते, जीवनसाथी निवडताना सर्वप्रथम त्याच्या/तिच्या चारित्र्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रामाणिक, नितीमूल्यांवर चालणारी, खोटं न बोलणारी आणि सहिष्णू व्यक्तीच आयुष्यातील चढ-उतारांना योग्यरीत्या सामोरे जाऊ शकते. अशा व्यक्तीकडे दयाळूपणा असतो, त्यामुळे ती केवळ तुमच्याशीच नव्हे तर इतरांशीही प्रेमाने वागते.
स्वभावाने शांत आणि संयमी स्त्रिया लक्ष्मीचे स्वरूप मानल्या जातात. अशा स्त्रिया केवळ घरात शांती निर्माण करत नाहीत, तर त्या ज्या घरात जातात तिथे भरभराट घडवून आणतात. सुशिक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि निर्णयक्षम स्त्री भविष्यासाठी अनमोल ठरते. ती केवळ जीवनसाथी नसून एक खंबीर आधारस्तंभ ठरते.
घाई नको, विचारपूर्वक घ्या निर्णय
चाणक्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, जीवनसाथी निवडताना घाईगडबड करू नका. समाज, कुटुंब आणि मित्रांचे मार्गदर्शन घेणं योग्य असलं तरी, अंतिम निर्णय स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहूनच घ्या. चुकीच्या घाईत घेतलेला निर्णय पुढे मोठ्या अडचणी निर्माण करू शकतो.
तसेच, चाणक्य नीतीनुसार ज्याच्यावर विश्वास ठेवतो तोच धोका देतो, असं अनेकदा दिसून येतं. त्यामुळे जोडीदार निवडताना त्याच्या वागणुकीचा, विचारसरणीचा आणि जीवनमूल्यांचा बारकाईने विचार करा.
Title : Chanakya Niti for a Happy Marriage






