चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘इतके’ कोटी रुपये; ICC नं जाहीर केली बक्षिसाची रक्कम

On: February 14, 2025 2:28 PM
Champions Trophy 2025 Prize Money Announced 
---Advertisement---

Champions Trophy 2025 | चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या स्पर्धेसाठी बक्षिसांची रक्कम जाहीर केली आहे. 8 संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने (ICC) मोठी रक्कम ठेवली आहे.

बक्षिसांच्या रक्कमेत मोठी वाढ

विशेष म्हणजे, मागील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) तुलनेत यंदा बक्षिसांच्या रक्कमेत 53% वाढ करण्यात आली आहे. तसेच, साखळी फेरीत सामने जिंकणाऱ्या संघांना वेगळे पैसे दिले जातील आणि स्पर्धेत शेवटच्या स्थानावर राहणारा संघसुद्धा रिकाम्या हाताने परतणार नाही.

विजेत्या संघाला मिळणार इतके कोटी रुपये

चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) 8 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. याआधी, 2017 मध्ये ही स्पर्धा खेळली गेली होती. 2017 च्या तुलनेत, यावेळी बक्षिसांच्या रक्कमेत 53% वाढ झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी एकूण 6.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. यावेळी विजेत्या संघाला 2.24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपये मिळतील, तर उपविजेत्या संघाला 1.12 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी सुमारे 5 कोटी रुपये मिळतील.

साखळी फेरीतून बाहेर पडणारे संघदेखील रिकाम्या हाताने जाणार नाहीत. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांना सुमारे 3 कोटी रुपये मिळतील, तर सातव्या आणि आठव्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांना सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये मिळतील. याशिवाय, साखळी फेरीतील प्रत्येक विजयासाठी सुमारे 30 लाख रुपये मिळतील. तसेच, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व आठ संघांना सुमारे 1 कोटी रुपये वेगळे दिले जातील.

आयसीसी (ICC) अध्यक्षांचे विधान

आयसीसीचे (ICC) अध्यक्ष जय शाह (Jay Shah) म्हणाले, “आयसीसी (ICC) पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) क्रिकेटसाठी एका महत्त्वाच्या क्षणाचे प्रतिनिधित्व करते. ही स्पर्धा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांना एकत्र आणते आणि प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. ही बक्षीस रक्कम खेळात गुंतवणूक करण्यासाठी आणि आमच्या स्पर्धांची जागतिक प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी आयसीसीच्या (ICC) निरंतर वचनबद्धतेचे प्रतीक आहे.” (Champions Trophy 2025)

Title : Champions Trophy 2025 Prize Money Announced 

 

Join WhatsApp Group

Join Now