Farmer Scheme l केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात असतात. राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी म्हणजेच पेरणी, फरवारणी कापणी अशा वेगवेगळ्या कामांसाठी शेतकरी वर्गाला आर्थिक मदत व्हावी यासाठी या योजना राबवल्या जातात. सरकारच्या या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक निधी मिळतो. तसेच कठीण काळात आधुनिक शेती करू शकतात हा यामागचा मुख्य उद्देश असतो. मात्र आज आपण सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या अशा तीन वेगवेगळ्या योजना जाणून घेणार आहोत, कि त्याचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल.
पंतप्रधान पीक विमा योजना :
देशातील सर्वात मोठी योजना म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना. या योजनेचा देशात पहिला क्रमांक लागतो. शेतात लावलेल्या पिकाचे नुकसान झाल्यावर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये कीड लागणे, नैसर्गिक संकट, दुष्काळ पडणे या कारणामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले तर सरकार अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते.
किसान क्रेडिट कार्ड :
केंद्र सरकारने राबवलेली किसान क्रेडिट कार्ड ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना आहे. सरकारने ही योजना 1998 साली सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक कर्ज दिले जाते. हे कर्ज शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने दिले जाते तर साधारण तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. आतापर्यंत किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.
Farmer Scheme l पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना :
केंद्र सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज करता येत आहे. मात्र या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दिला जातो. तसेच शेतकऱ्यांना ही मदत प्रत्येक चार महिन्यांना दिली जाते. ज्या शेतकऱ्यांना या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकता.
News Title- Central Goverment Farmer Scheme
महत्त्वाच्या बातम्या
महायुतीला निवडणूक सोपी नाही, कारण राज्यात… छगन भुजबळांनी सांगितला नेमका मुद्दा
‘या’ तीन चुका कधीच करू नका; नाहीतर आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप
काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, ‘या’ भागांना हवामान विभागाचा इशारा
पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सर्वात मोठी माहिती समोर!
ग्राहकांच्या खिशाला झळ, सोन्याच्या भावात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर






